Shiv Sena : अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सावंत आणि देसाई यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.