• Download App
    वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा : भारती पवार । Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार असून लॉकडाऊनचा निर्णय राज्यसरकारचा असेल, असे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले. Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    सध्या देशामध्ये ओमीक्रोनसह कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. बाधित रुग्णांची संख्या देखील चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. देशातील सर्वच राज्यांना केंद्रांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या काळजी करण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे अन्यथा वेळ पडल्यास कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी दिला. त्या सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

    भारती पवार या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी त्या सांगली दौऱ्यावर आल्या होत्या. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, महिला मोर्चाच्या स्वाती शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. मंत्री भारती पवार यांचा यावेळी मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

    • वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार
    • लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा
    • नागरिकांनी काळजी घ्यावी, बेफिकीर राहू नये
    • कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे
    • सर्वच राज्यांना केंद्रांकडून खबरदारीच्या सूचना

    Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल