सोमय्या आज आणखी एक घोटाळा बाहेर काढणार?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबाशी संबंधित आणखी एका कंपनीचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा काल पत्रकार परिषदेत दिला. आज दुपारी एक वाजता किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद होणार आहे. नॉट रिचेबल का होते याचेही उत्तर आज देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. Somaiya will bring out another scam today?



मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित कंपन्यांवर मनी लाँड्रिंगचे आरोप केल्यानंतर आता ठाकरे कुटुंबातील कोणाला सोमय्या अडचणीत आणणार याची उत्सुकता आहे.

अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांवर आयकर विभागाने किंवा अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली. त्यांच्या मालमत्ता तात्पुरत्या ताब्यात घेतल्या. सोमय्या यांनी केलेले आरोप यामागे आहेत. त्यामुळे सोमय्या आज काय बोलणार याची उत्सुकता आहे.

Somaiya will bring out another scam today?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात