राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका कर्मचाऱ्याचा बीपी वाढून मृत्यू झाला. अनेक कर्मचारी बेपत्ता झाले असल्याचा आरोप होत आहे.Shocking, ST employee’s body found, several employees reported missing
विशेष प्रतिनिधी
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका कर्मचाऱ्याचा बीपी वाढून मृत्यू झाला. अनेक कर्मचारी बेपत्ता झाले असल्याचा आरोप होत आहे.
महेश लोले या कोल्हापूरच्या कागल डेपोतील कर्मचाऱ्याचा मृतदेह परेल येथे सापडला. दादर पोलीस ठाण्यात लोले यांच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
महेश लोले चार दिवसांपूर्वीच मुंबईत आले होते अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते काल आझाद मैदान किंवा आंदोलन स्थळी गेले नव्हते. त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही पद्धतीच्या जखमा किंवा निशाण आढळून आले नाहीत..
महेश लोले यांना दारूचे व्यसन होत त्यांनी नशामुक्त केंद्रात काही कालावधी घालवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लोले यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून कुटुंबीय मुंबईत येत आहे..कुटुंबियांच्या समोर लोले यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे. सध्यातरी त्यांचा मृत्यूच कोणतंही संशयास्पद कारण आढळून येत नाही. तरी शविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App