कंगना ही तर नाची!!, प्रतिक्रिया व्यक्त करण्याएवढी तिची लायकी नाही; वडेट्टीवार यांचीही मुक्ताफळे!!

वृत्तसंस्था

नागपूर : भारताला स्वातंत्र्य भिकेत मिळाले आहे. महात्मा गांधी यांचा क्रांतिवीर भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता, अशा स्वरूपाची मुक्ताफळे उधळून देशात वादळ निर्माण करणारी अभिनेत्री कंगना राणावत तिच्या संदर्भात देखील त्याच स्वरुपाची मुक्ताफळे महाराष्ट्राचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उधळली आहेत.She’s not worthy to make a comment on Mahatma Gandhi. She’s a ‘nachaniya’, considered one of the controversial people

कंगना राणावत ही तर नाची (नचनियाँ) आहे. तिच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याएवढी तिची लायकी नाही, अशा शब्दांमध्ये वडेट्टीवार यांनी कंगना टवर तोफ डागली आहे. कंगना राणावत हिने महात्मा गांधी यांच्यावर टीका करणे म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. जो सूर्यावर थुंकतो, त्याची थुंकी त्याच्याच तोंडावर येऊन पडते. कंगनाचे तसेच झाले आहेत, अशा शेलक्या शब्दांत वडेट्टीवार यांनी कंगना राणावत हिचे वाभाडे काढले आहेत.

कंगना राणावत हिच्यावर देशभरातून टीकेचा भडिमार होताना दिसतो आहे. तिने एकामागून एक वादग्रस्त विधाने केली आहेत. आधी इंडिया टुडेच्या मुलाखतीत तिने देशाला स्वातंत्र्य भिकेच्या स्वरूपात मिळाले.

2014 नंतर खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महात्मा गांधी यांचा भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता, असे वक्तव्य करून तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही जुन्या बातम्यांची क्लिपिंग्ज टाकली आहेत. याच मुद्द्यावरून तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने कंगना विरुद्ध मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

She’s not worthy to make a comment on Mahatma Gandhi. She’s a ‘nachaniya’, considered one of the controversial people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात