सोनिया ते सुनेत्रा; पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा चुकलेला पाढा!!

नाशिक : सोनिया ते सुनेत्रा; पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा चुकलेला पाढा!!, असंच म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आली. Sharad Pawar

शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये भले महिला सक्षमीकरणासाठी काही निर्णय घेतले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे सोडून बाकीच्या महिला नेतृत्वांना विरोधच करून पाहिला पण तो विरोध इतका फेल गेला की त्यांना त्या महिला नेतृत्वांच्या पुढे शरणागती पत्करल्याशिवाय गत्यंतर उरले नाही. सोनिया गांधी आणि सुनेत्रा पवार यांना विरोध करून पवारांचा राजकीय कारकीर्दीचा पाढा चुकला.

– सोनिया गांधींना विरोध

शरद पवारांनी सोनिया गांधींना विरोध करून स्वतःची वेगळी राजकीय चूल मांडली. परदेशात जन्माला आलेली व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी नको, असे सांगून पवारांनी सोनिया गांधींच्या नावाला विरोध केला, त्यामुळे सोनिया गांधी पंतप्रधान बनल्या नाहीत हे खरे, पण सोनिया गांधी या काँग्रेसच्या संघटनेच्या बळावर आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर पक्षाच्या एवढ्या मोठ्या नेत्या बनल्या, की त्यांच्याकडे दुसऱ्या व्यक्तीला पंतप्रधान बनविण्याची ताकद आली आणि त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी नेमले. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करायचा शरद पवारांचा होरा चुकला. उलट आपलीच राजकीय कारकीर्द पुढे ढकलण्यासाठी शरद पवारांना सोनिया गांधींच्या पुढे शरणागती पत्करून केंद्रातले कृषिमंत्री पद पदरात पाडून घ्यावे लागले. त्यावेळी सोनिया गांधींनी परवानगी दिली म्हणून पवारांची कारकीर्द पुढे रेटू शकली. अन्यथा सोनिया गांधींनी थोडी ताठर भूमिका घेतली असती तर पवारांच्या कारकिर्दीने तेव्हाच गटांगळ्या खाल्ल्या असत्या.



– सुनेत्रा पवारांना हिणवले

सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करायचा पवारांचा होरा चुकला, तसाच तो सुनेत्रा पवार यांना “बाहेरून आलेल्या पवार” असे हिणवल्यामुळे चुकला. पवारांनी बारामती लोकसभा निवडणुकीत “मूळच्या पवार” आणि “बाहेरून आलेल्या पवार” असा सामना रंगविला. त्यात त्यांनी “मूळच्या पवार” म्हणून सुप्रिया सुळे यांना निवडून आणले. सुनेत्रा पवार यांना पाडले. पण नियतीचे फासे आणि चक्र असे काही फिरले, की पवारांच्या स्वप्नातली महिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याऐवजी पवार यांनी विरोध केलेली “बाहेरून आलेली पवार” महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हवे असेल तर “बाहेरून आलेल्या पवारांचे” नेतृत्व स्वीकारायची पाळी शरद पवारांवर आणि त्यांच्या अनुयायांवर आली.

– पवारांचा होरा सतत चुकला

इथे सुद्धा पवारांचा राजकीय होरा चुकला. त्यांना आपल्या स्वप्नातली महिला म्हणजेच सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तर बसवता आले नाहीच, उलट विरोध केलेली महिला उपमुख्यमंत्री पदी स्वीकारायची वेळ त्यांच्यावर आली. सोनिया गांधींनी स्वकर्तृत्वावर शरद पवारांवर मात करून दाखविली. तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावर बसवून नियतीने पवारांवर मात केली. सोनिया गांधी आणि सुनेत्रा पवार यांच्यासमोर शरद पवार हरले.

Sharad Pawar missed calculated Sonia Gandhi and Suntra Pawar’s leadership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात