शहरी नक्षलवादाच्या फेरतपासाबाबत शरद पवारांनी लिहिले होते मुख्यमंत्र्यांना पत्र, पण तपास गेला एनआयएकडे!!

प्रतिनिधी

मुंबई – भीमा-कोरेगावप्रकरणी चौकशी आणि तपासासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जानेवारी २०२० मध्ये पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी राज्यातील मागील भाजप सरकारबद्दल संशय व्यक्त केला होता.Sharad Pawar had written a letter to the Chief Minister regarding the revision of urban Naxalism, but the investigation went to NIA !!

त्यावेळच्या सरकारच्या काळात पोलीस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी आपल्याकडे आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यामुळे या प्रकारांची खोलात जाऊन चौकशी आवश्यक आहे.



भीमा कोरेगाव दंगलीला एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामधील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरुन कारवाई करण्यात आली. पण ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात बुद्धीजीवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. म्हणून याप्रकरणी एसआयटी नेमावी, असे शरद पवार यांनी पत्रात लिहिले होते.

कॉम्रेड सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादीत कविता वाचल्यामुळे त्यांना अटक केली. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

’गोलपीठा’मध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाजविघातक म्हणून निष्कर्ष काढू नयेत, असेही पवार यांनी पत्रात म्हटले होते.
पवारांच्या या पत्रानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने भीमा कोरेगाव दंगलीचा तपास आपल्याकडे घेतला.

Sharad Pawar had written a letter to the Chief Minister regarding the revision of urban Naxalism, but the investigation went to NIA !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात