विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा,’ अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी सुनावले…Supreme Court
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून माध्यमांमध्ये कोर्टाच्या कामकाजावर व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाबाबत सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“तुम्ही कोर्टात घाई करता व बाहेर जाऊन कोर्ट निर्णय देत नाही अशी विधाने करता, हे खपवून घेतले जाणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी सुनावणी जुलैअखेरीस घ्यावी व कुणालाही अशी बेजबाबदार वक्तव्ये करता येणार नाहीत, अशी मागणी केली. त्यानुसार ३० जुलैची तारीख निश्चित झाली.
Shiv Sena Symbol Case Scheduled for July 30; SC Rebukes Thackeray Faction
महत्वाच्या बातम्या
- प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यातल्या कार्यक्रमात चाव्यांचे वाटप
- काळा कोट घालून ममता हायकोर्टात; पण TMC चा नेता शमीम अहमदच्या घरावरच्या छाप्यातून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!
- इंधन बचतीसाठी मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!
- दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक; पण साध्य काय होणार??