• Download App
    Reduction in the number of vehicles in Modi's fleet to save fuel; But playing with safety is dangerous!! इंधन बचतीसाठी मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!

    इंधन बचतीसाठी मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!

     

    नाशिक : इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!, असाच सूर देशातल्या सुरक्षा एजन्सींमधून बाहेर यायला लागलाय, त्याकडे काणाडोळा करून चालणार नाही.Reduction in the number of vehicles in Modi’s fleet to save fuel; But playing with safety is dangerous!!

    – मोदींच्या ताफ्यात फक्त दोन गाड्या

    पश्चिम आशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला झळा पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केले. त्या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी स्वतःच्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. सुरक्षा प्रोटोकॉलसाठी आवश्यक असतील तेवढ्याच गाड्या घेऊन ते फिरले. राजधानी दिल्लीमध्ये असे दृश्य दोनदा दिसले. त्यांच्या ताफ्यामध्ये दोनच गाड्या आढळल्या. ते आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेले, त्यावेळी विमानतळावर पोचताना सुद्धा मोदींच्या ताफ्यात फक्त दोनच गाड्या आढळल्या. मोदी बोलतात, तसे वागतात हे बघायला चांगले वाटले. पण म्हणून ते योग्यच आहे, असे मात्र अजिबात नाही.



    – मोदींच्या सुरक्षेविषयी चिंता

    मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षिततेविषयी मोठी चिंता निर्माण करणारा सूर भारतीय सुरक्षा एजन्सींमधून समोर आला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत किंवा सोने खरेदी टाळणे वगैरे उपाययोजना करणे ठीक आहे. त्यात काही गैर नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत कुठलीही त्रुटी ठेवून चालणार नाही. ती परवडणार नाही, अशा आशयाचे गंभीर मत रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात RAW चे माजी संचालक सामंत गोयल यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना असलेल्या सुरक्षा विषयक धोक्याच्या जाणिवा त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये करून दिल्या. आज आंतरराष्ट्रीय सुरक्षा एवढी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर किमान तीन वेळा हल्ले झालेत. देशातल्या आणि देशाबाहेरच्या इस्लामी जिहादी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत कुठली घट केली, तर त्यापासून उत्पन्न होणारा धोका कितीतरी वाढतो हे नीट लक्षात घेतले पाहिजे. त्यानुसार आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या पाहिजेत. उगाच इंधन बचतीच्या नावाखाली मोदींच्या सुरक्षा रचनेत किंवा व्यवस्थेत घट करणे चुकीचे ठरेल, असे परखड मत सामंत गोयल यांनी व्यक्त केले.

    सामंत गोयल ज्या रिसर्च अँड ॲनॅलिसिस अर्थात RAW चे
    संचालक होते, त्या संस्थेतल्या वरिष्ठ पदस्थाने मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करणे, याला विशेष महत्त्व आहे.

    – सुरक्षेतल्या त्रुटी परवडणाऱ्या नाहीत

    एक तर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताने दोन पंतप्रधान आधीच गमावलेत. देशातल्या आणि देशाबाहेरच्या जिहादी दहशतवाद्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटींचे फायदे घेऊन अनेक ठिकाणी हल्ले केलेत. स्वतः मोदींनी सुद्धा पंजाब मध्ये सुरक्षेतील त्रुटीचा आणि धोक्याचा अनुभव घेतला होता. अशा स्थितीत आज बाहेर युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून इंधन बचतीच्या बाहण्याने किंवा लोकप्रियतेच्या लाटेत वाहून जाऊन सुरक्षा विषयाची तडजोड करणे भारतातल्या कुठल्याच व्यवस्थेला परवडणारे नाही. त्यातही पंतप्रधानांसाठी महत्त्वाच्या संस्थेविषयी तर ते फारच परवडण्याच्या पलीकडचे असेल.

    – मोदींकडून वेगळ्या अपेक्षा

    याचा अर्थ मोदींनी इंधन बचतीचा संदेश देऊ नये किंवा त्यांचे अनुकरण करू नये, असा बिलकुल नाही. उलट त्यांनी इंधन बचतीसाठी अधिक कठोर उपाय योजना कराव्यात. केवळ व्यापारी वृत्तीच्या सोडून अन्य आर्थिक सुधारणा करून देशाला आर्थिक शिस्त लावावी. त्यातून इंधनाची आणि पैशांची बचत करावी आणि ती वाढवावी, ही नरेंद्र मोदी यांच्यासारख्या परिपक्व नेत्याकडून अपेक्षा आहे. ती त्यांनी पूर्ण केली, तर त्यांना जनतेचा आज एवढा पाठिंबा मिळतो आहे, त्यापेक्षा त्यांना मिळणारा पाठिंबा वाढल्याशिवाय राहणार नाही.

    – विरोधकांचा नेहमीचा आरडाओरडा

    तसेही मोदींनी काहीही केले, तरी विरोधक आरडाओरडा केल्याशिवाय राहात नाहीत. तसा त्यांनी आताही आरडाओरडा करून पाहिला. पण मोदींना त्याचा फरक पडला नाही. मग उगाच स्वतःच्या सुरक्षा ताफ्यामधल्या गाड्यांची संख्या कमी करण्याची उथळ उपाययोजना करण्यात मतलब नाही.

    – सुरक्षेचे गांभीर्य नाकारण्यात मतलब नाही

    सामंत गोयल यांच्या सारख्या वरिष्ठ पदस्थाने सांगितल्यानुसार पंतप्रधान मोदींनी उगाच स्वतःच्या सुरक्षेशी तडजोड करण्याऐवजी इतर मार्गाने इंधन बचतीचा उपाय करावा. तरच तो लाभदायक ठरेल अन्यथा सुरक्षाविषयक तडजोड महागात पडली, तर पश्चात बुद्धीने पश्चात्ताप करून काही उपयोग होणार नाही!! अर्थात नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्याला हे समजत नसेल असे नाही, पण दृश्य स्वरूपात जे दिसते त्यावरून सुरक्षा एजन्सीमधल्या वरिष्ठ पदस्थाने व्यक्त केलेल्या मताचे आणि चिंतेचे गांभीर्य नाकारण्यातही मतलब नाही.

    Reduction in the number of vehicles in Modi’s fleet to save fuel; But playing with safety is dangerous!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक; पुण्यातून 1 ब्युटीशियनही ताब्यात; गेस पेपर 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला

    Red Fort Bomb Blast : दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटप्रकरणी 7500 पानांचे आरोपपत्र सादर; 10 आरोपींवर दहशतवादी नेटवर्क चालवल्याचा आरोप, 8 दहशतवाद्यांपैकी 5 डॉक्टर

    दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक; पण साध्य काय होणार??