नाशिक : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीवर पोहोचले, त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इराणचे परराष्ट्रमंत्री आराघाची भारत भेटीवर आले. पश्चिम युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भेटी महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या.Donald Trump on a visit to China; At the same time, the Russian Foreign Minister and the Iranian Foreign Minister are visiting India!!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन भेटीवर गेले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे स्वागत केले. चीन आणि अमेरिका हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहायला नकोत. ते एकमेकांचे सहकारी व्हायला हवेत, असे शी जिनपिंग यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातल्या संबंधांचे गोडवे गायले. अमेरिकेच्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षांपेक्षा आपली चीन भेट जास्त महत्त्वाचे आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
– अमेरिकेकडे बेस्ट बिझनेसमेन असल्याचा दावा
आपण अमेरिकेतले सगळ्यात बेस्ट बिजनेसमेन चीनमध्ये घेऊन आलो आहोत. अमेरिकेएवढे बेस्ट बिजनेसमेन कुणाकडेच नाहीत. चिनी बिझनेसमेनने अमेरिकन बिझनेसमेन बरोबर वाटाघाटी करून द्विपक्षीय व्यापार वाढवावा. त्यामुळे अमेरिका आणि चीन सगळ्या जगाला मागे टाकतील, असा दावा 2018 यांनी केला. चिनी राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शाही मेजवानी दिली. पण चीन आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापाराविषयी थेट कुठली कमिटमेंट दिली नाही.
– रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोदींबरोबर चर्चा
डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये असतानाच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इराणचे परराष्ट्रमंत्री आराघाची भारताच्या दौऱ्यावर आले. BRICS देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला रशियाचे आणि इराणचे परराष्ट्रमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वतंत्रपणे भेटी घेतल्या.
– इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्पचा दावा खोडला
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातले युद्ध थांबल्याचा दावा चीनमध्ये केला, पण इरणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतात येऊन तो दावा खोडून काढला. अमेरिकेने लादलेल्या कुठल्याही अपमानास्पद अटी इराणने स्वीकारलेल्या नसल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भारत आणि रशिया यांच्यातल्या दृढ संबंधांविषयी चर्चा केली. नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात लवकरच होणाऱ्या द्विपक्षीय परिषदेविषयी मोदींना माहिती दिली.
– भारताचे राजनैतिक महत्त्व अधोरेखित
डोनाल्ड ट्रम्प यांची चीन भेट आणि रशियन परराष्ट्र मंत्र्यांची भारत भेट एकाच दिवशी घडल्याने जागतिक सत्ता संतुलनात भारताचे राजनैतिक महत्त्व अधोरेखित झाले. त्यातच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीमुळे पश्चिम आशियातल्या युद्धात भारताची भूमिकाही महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले.
Donald Trump on a visit to China; At the same time, the Russian Foreign Minister and the Iranian Foreign Minister are visiting India!!
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi : राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही; CBI संचालक निवडीवर असहमती, पंतप्रधानांच्या घरी बैठक
- पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त दोन कार; केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा घेतला “संदेश”; पण विरोधकांकडून मात्र खिल्ली!!
- Eileen Wang : अमेरिकेची माजी महापौर चिनी गुप्तहेर निघाली:बेकायदेशीरपणे चीनसाठी काम केल्याची कबुली दिली
- राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी सगळी तडफड!!