नाशिक : पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा झालेला पराभव पाहून मुस्लिमांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या खुर्ची खाली “राजकीय बॉम्ब” पेरलाय, की काही दुसरीच खेळी केली आहे??, असा सवाल उत्पन्न करणारे वक्तव्य मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी आज केले. त्यांनी अचानक अखिलेश यादवांच्या विरोधात वक्तव्य केल्याने राजकीय संशय बळावला. मुस्लिम खरोखरच अखिलेश यादवांच्या विरोधात जातील का??, असा संशय निर्माण झाला.political bomb” of Muslims under Akhilesh Yadav’s chair or some other ploy??
असं काय म्हणाले मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी?, की त्यामुळे ते वेगळाच डाव खेळल्याचे दिसून आले. ते म्हणाले, मुस्लिमांनी आत्तापर्यंत नेहमीच समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला. त्याच पक्षाला मतदान केले. पण आता मी माझ्या समुदायाला म्हणजेच मुसलमान समाजाला आवाहन करतो, की त्यांनी समाजवादी पार्टीला आत्तापर्यंत दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. अखिलेश यादव यांनी ज्या वेळेपासून समाजवादी पार्टीची सूत्रे हाती घेतलीत, त्या वेळेपासून समाजवादी पक्षाचे राजकीय स्वरूप आणि चारित्र्यच बदलून गेले आहे. मुलायम सिंह यादव हे मुसलमानांचे हितचिंतक होते. पण अखिलेश यादव तसे नाहीत. मुस्लिमांच्या हिताच्या विषयांवर त्यांनी नेहमीच मौन बाळगले. त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर मुसलमानांची बाजू घेतली नाही. ते मथुरेच्या मुद्द्यावर देखील मुसलमानांच्या बाजूने बोलले नाहीत. त्यामुळे मुसलमानांनी अखिलेश यादव यांच्यावर विश्वास ठेवून समाजवादी पार्टीला मतदान करू नये. समाजवादी पार्टीच्या ऐवजी दुसरा राजकीय पर्याय शोधावा!!
राजकीय बॉम्बचा भास
मौलाना शहाबुद्दीन यांचे हे वक्तव्य समाजवादी पार्टीच्या दृष्टीने एवढे स्फोटक आहे, की खरंच त्यांनी समाजवादी पार्टीच्या म्हणजेच अखिलेश यादव यांच्या खुर्ची खाली राजकीय बॉम्ब ठेवल्याचा भास व्हावा. कारण समाजवादी पार्टीचा राजकीय श्वासच मुस्लिम आणि यादव यांच्या मतांवर टिकून राहिलाय. त्यातले मुस्लिम निघून गेले आणि त्यांनी समाजवादी पार्टीला मतदान केले नाही, तर समाजवादी पार्टीच्या राजकीय अस्तित्वात धोका निर्माण होतो. त्यामुळे मौलाना शहाबुद्दीन यांचे वक्तव्य वरवर पाहता स्फोटक भासते.
– धागेदोरे ममतांच्या पराभवात
पण यात समाजवादी पार्टी आणि मौलाना शहाबुद्दीन यांची political game दडल्याचे सुद्धा दिसून येते. त्याचे धागेदोरे पश्चिम बंगाल मधल्या ममता बॅनर्जींच्या पराभवात आढळतात.
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींनी मुस्लिम समाजाचे ध्रुवीकरण केले. त्यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाचा एवढा अतिरेक केला, की त्यामुळे बंगाल मधला सगळा हिंदू समाज एकवटला. हिंदू समाजाने अक्षरशः १०० % टक्के मतदान केले आणि ते भाजपच्या बाजूने केले. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या मुस्लिम एकजुटीचा प्रभाव अपेक्षा एवढा टिकून राहिला नाही. त्यांना सत्ता मिळाली नाही. मुस्लिमांच्या मतांच्या बळावर त्यांना ८० आमदार निवडून आणता आले. याचा अर्थ ममता बॅनर्जींची पश्चिम बंगाल मधली सत्ता गेली, पण मुस्लिम मतांच्या आधारे त्यांचे राजकीय अस्तित्व टिकले. पश्चिम बंगाल मध्ये हिंदू मुस्लिम परस्पर ध्रुवीकरण झाल्याचा फटका ममता बॅनर्जी यांना बसला.
– अखिलेशना मुस्लिम ध्रुवीकरणाचा फटका बसू नये म्हणून…
तसा फटका उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांना बसू नये, यासाठी तर मौलाना शहाबुद्दीन यांनी मुस्लिमांना अखिलेश यादव यांच्यापासून दूर जाण्याचा सल्ला तर दिला नाही ना??, असा संशय या निमित्ताने बळावला. अखिलेश यादव यांनी मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले नाही, तर हिंदू ध्रुवीकरण होण्याचा पायाच ठिसूळ होतो. अशावेळी मुस्लिमांनी जाहीरपणे अखिलेश यादव यांच्या विरोधात बोलायचे, पण शांतपणे वेळ येताच मतदान करायचे, अशी कुठली political strategy तर यामागे नाही ना??, असा दाट संशय मौलाना शहाबुद्दीन यांच्या वक्तव्यामुळे बळावला.
– मुस्लिमांचा Voting pattern
कारण मुस्लिम समाज इतर कुठल्याही समाजांपेक्षा राजकीय दृष्ट्या अधिक सजग आणि अधिक एकवटलेला आहे. तो समाज नेहमीच strategic voting करतो. त्यामुळेच देशातल्या कुठल्याही निवडणुकीतले निकाल इकडे – तिकडे सरकतात किंवा बदलून जातात. हा आतापर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव आहे. उत्तर प्रदेशात पुढच्या ७ महिन्यांमध्ये अशाच प्रकारे काही strategy आखून मतदानाचा पॅटर्न आपल्या दिशेने वळविण्यासाठी मौलाना शहाबुद्दीन यांनी अखिलेश यादव यांच्या विरोधात “राजकीय बॉम्ब” पेरल्याचे भासविले नाही ना??, त्यांनी प्रत्यक्षात भाजपचीच विकेट काढायचा बॉल तर टाकला नाही ना??, या संशयाला पुष्टी मिळाली.
– समाजवादी पार्टीची साथ सोडणे शक्य नाही
कारण मुस्लिम सहजासहजी समाजवादी पार्टीची साथ सोडणे शक्य नाही. कारण त्यांचे तिथे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध घट्ट झालेत. ते एका निवडणुकीत संपणारे नाहीत. शिवाय अखिलेश यादव यांच्यावर मौलाना शहाबुद्दीन यांनी केलेला आरोप सुद्धा खरा नाही. उलट मुलायम सिंग यादव यांच्या पेक्षा अखिलेश यादव यांनीच मुस्लिमांचे जास्त तुष्टीकरण केले याचेच पुरावे नजीकच्या इतिहासात जास्त मिळालेत. त्यांनी ज्ञानवापी मशीद आणि मथुरेच्या मुद्द्यावर मुस्लिमांची बाजू उचलून धरल्याच्या बातम्या आधीच येऊन गेल्यात. त्यामुळे फक्त अखिलेश यादव यांच्या बाजूने उघडपणे मुस्लिम ध्रुवीकरण होऊ नये आणि त्याचा परस्पर परिणाम हिंदू ध्रुवीकरणात होऊ नये, यासाठी मौलाना शहाबुद्दीन यांनी अखिलेश यादव यांच्या खुर्ची खाली राजकीय बॉम्ब पेरल्याचे भासविले. यापेक्षा त्यांच्या वक्तव्याला दुसरा कुठलाही राजकीय अर्थ नाही.
political bomb” of Muslims under Akhilesh Yadav’s chair or some other ploy??
महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्प चीन भेटीवर; त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री आणि इराणचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर!!
- पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यातली बॉटनिकल गार्डनची जमीन अखेर सरकारकडून पुण्यातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोफत!!
- सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्याच दिशेने; मग परिणाम काय होईल?
- Amul : अमूल दूध प्रति लिटर ₹2 महागले; पाठोपाठ मदर डेअरीचीही दरवाढ, नवीन दर आजपासून लागू