CJI Chandrachud, : सुप्रीम कोर्ट प्रशासनाचे केंद्राला पत्र- माजी CJI चंद्रचूड यांचा सरकारी बंगला रिकामा करून घ्या!
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या सरकारी बंगल्यात (५, कृष्णा मेनन मार्ग) निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ राहत आहेत. आता सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की माजी सरन्यायाधीशांना त्यांचा बंगला लवकरच रिकामा करण्यास सांगितले पाहिजे, जेणेकरून आम्ही तो न्यायालयाच्या हाऊसिंग पूलमध्ये समाविष्ट करू शकू.