आगीत मोबाईल फोनसह रोख रक्कम व टपरीवरील साहित्य जळून खाक झाले.तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.Satara: Cylinder tank explodes at a tea tap at RTO Chowk; The fire damaged the material on the tapri
विशेष प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यात नवीन आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने टाकीला अचानक आग लागली. दरम्यान या आगीत टपरीवरील साहित्याचे नुकसान झाले आहे.कोणतीही जिवितहानी झालेली नाही. तसेच आगीत मोबाईल फोनसह रोख रक्कम व टपरीवरील साहित्य जळून खाक झाले.तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
सकाळी नेहमीप्रमाणे आरटीओ ऑफिसला येणारे लोक येथे चहा घेण्यासाठी थांबले होते.यावेळी चहाच्या टपरीवरील सिलेंडरच्या टाकीला गॅस गळती झाली.गॅस गळती सुरू झाल्याचे दिसताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाली.अग्निशामक जवानांनी पेटलेला सिलेंडर बाजूला करत आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. आग लागल्याने परिसरात लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App