• Download App
    Sanjay Shirsat कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील

    Sanjay Shirsat : कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील

    Sanjay Shirsat

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sanjay Shirsat  महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.Sanjay Shirsat

    शिरसाट म्हणाले की, पक्ष सोडणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस दिली जाऊ शकते, मात्र हे सहाही खासदार एकत्रितपणे त्याला सामोरे जातील. “त्यांनी कुठे जायचे, काय निर्णय घ्यायचा याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.Sanjay Shirsat



    “पाणी वाहून गेल्यावर फोन करून उपयोग नाही”

    उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचा स्वभावच असा आहे की ते शेवटच्या क्षणी फोन करतात. मात्र पाणी वाहून गेल्यावर मनधरणी करून काही उपयोग होत नाही. नाराजी खूप आधीपासून होती. अनेक खासदारांनी आपल्या भावना पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या होत्या, पण त्याची दखल घेतली गेली नाही.”

    ‘ऑपरेशन टायगर’बाबत बोलताना त्यांनी दावा केला की, “हे कोणतेही नियोजित ऑपरेशन नव्हते. खासदार स्वतः नाराज होते आणि त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला आहे. गद्दार, खोके अशी टीका करणे हे ठाकरे गटाचे ठरलेले राजकारण आहे.”

    विधान परिषदेत महायुतीचाच विजय होणार

    विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना शिरसाट यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. “सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. केवळ महायुतीचेच नव्हे तर इतर मतदारांचेही समर्थन आम्हाला मिळत आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये एकजूट दिसली नाही, त्यामुळे त्यांचा पराभव आधीच निश्चित होता,” असे ते म्हणाले.

    “ठाकरे गटाकडे आता पर्यायच उरलेला नाही”

    ठाकरे गटाच्या सध्याच्या भूमिकेवर टीका करताना शिरसाट म्हणाले, “एकीकडे ते खासदारांची मनधरणी करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्यावर कारवाईची भाषा करत आहेत. नेमके काय करायचे आहे, हेच त्यांना समजत नाही. आता घडणाऱ्या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.”

    त्यांनी पुढे दावा केला की, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या निवासस्थानी रोज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होत असते. अनेक जण पक्षप्रवेशासाठी येत आहेत.”

    “कार्यकर्ते तुमचेच डोके फोडतील”

    संजय राऊत यांनी ‘राडा’ करण्याचा इशारा दिल्यानंतर शिरसाट यांनीही पलटवार केला. “कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करू नका. तेच कार्यकर्ते वैतागून तुमच्याविरोधात उभे राहतील. पक्षाची आज जी अवस्था झाली आहे, त्याला जबाबदार कोण आहे, हे जनतेला माहिती आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

    राऊतांचे प्रत्युत्तर; “पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर तोडून उत्तर देऊ”

    दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. “एकदा पक्ष फोडला, आता पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होत आहे. पण यापुढे तसे होऊ देणार नाही. पक्ष फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसैनिक रस्त्यावर उतरून उत्तर देतील,” असा इशारा त्यांनी दिला.

    तसेच, “आमचा पक्षच खरी शिवसेना आहे. आमचे खासदार फुटल्याचा दावा करणाऱ्यांनी आधी त्याचे पुरावे द्यावेत,” असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे.

    ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय संघर्ष शिगेला

    ठाकरे गटातील सहा खासदारांच्या कथित बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप सुरू आहेत. खासदारांची अंतिम भूमिका, लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्राची स्थिती आणि पुढील काही दिवसांतील राजकीय हालचाली याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ खरोखर यशस्वी झाले की नाही, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

    “Abuse Triggered the Exploded Split”: Sanjay Shirsat on 6 Shiv Sena UBT MPs’ Rebellion

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

    Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

    Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?