Sanjay Shirsat : कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील
महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.