• Download App
    missing link मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून दोन कट्टर पवार विरोधक आमने - सामने!!

    मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून दोन कट्टर पवार विरोधक आमने – सामने!!

    नाशिक : मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले. त्यामुळे दोन कट्टर पवार विरोधक एकमेकांच्या विरोधात गेल्याचे सगळ्या महाराष्ट्रासमोर आले.

    – देवेंद्र फडणवीस टार्गेटवर

    तुफान पावसामुळे मिसिंग लिंक वरची दरड कोसळली त्यामुळे वाहतुकीवर बराच परिणाम झाला तब्बल 18 तासानंतर वाहतूक सुरू झाली पण त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याची संधी घेतली. अनेकांनी सोशल मीडियावर सभ्यता सोडून कमेंट केल्या त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आणि त्यांनी विधानसभेत जोरदार भाषण करून मिसिंग लिंकचे समर्थन केले. त्याचबरोबर काही राजकीय वस्तुस्थिती सुद्धा मांडली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकचे काम होऊच नये, यासाठी दोन पानी पत्र लिहून 14 कारणे दिल्याची माहिती सांगितली. ही माहिती पृथ्वीराज चव्हाण यांना टोचली. त्यामुळे त्यांनी बीबीसी मराठीला मुलाखत देऊन देवेंद्र फडणवीस यांचे वाभाडे काढले.

    – रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचे तोंडसुख

    वास्तविक मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण सुरुवातीला काही बोलले नव्हते. पावसानंतर झालेल्या दुर्दशेवर सुद्धा त्यांनी कुठले भाष्य केले नव्हते. रोहित पवार, सुप्रिया सुळे बाकीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले होते. सोशल मीडियावर अनेकांनी सभ्यता सोडून कमेंट केल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांना नावे न घेता ठोकून काढले.



    – पण पृथ्वीराज चव्हाणांना अकारण टोचले

    पण त्यांनी मिसिंग लिंक होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी दोन पानी पत्र घेऊन चौदा करणे दिल्याची माहिती विधानसभेत सांगितली. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात यावे लागले आणि त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या कामाचे वाभाडे काढले. 2013 मध्ये मिसिंग लिंकच्या कामाची किंमत जास्त वाटल्याने तिची पुनर्रचना करायला सांगितली होती, पण ती केली गेली नव्हती. त्यामुळे ते काम रखडले होते, असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पण त्या पलीकडे जाऊन 40% कमिशनचा मुद्दा त्यांनी काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोचले.

    – दोन कट्टर पवार विरोधक एकमेकांच्या विरोधात

    मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर फडणवीस आणि चव्हाण असे आमने – सामने आल्यामुळे दोन कट्टर पवार विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर आले. पृथ्वीराज चव्हाण यांनीच मुख्यमंत्री असताना सिंचन घोटाळ्याचा मुद्दा काढला होता. त्यामुळे अजित पवार अडचणीत आले होते. त्याचा लाभ देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी करून घेतला होता. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनीच राज्य सहकारी बँकेचा घोटाळा बाहेर काढला होता. त्यातून सुद्धा अजित पवारच अडचणीत आले होते. त्याचा सुद्धा फडणवीस यांनी भाजपसाठी करून घेतला होता. पण नंतर बरेच राजकारण फिरले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मित्र झाले होते. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्येच राहिल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूपासून बाजूला झाले. पण एकेकाळी पवार विरोधातले मुद्दे काढणारे मुख्यमंत्री आणि त्याचा राजकीय वापर करून त्यावेळचे विरोधी पक्षनेते आज मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून मात्र एकमेकांच्या विरोधात गेल्याचे दिसले.

    Two staunch opponents of Pawar lock horns over the ‘missing link’ issue!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Monsoon : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पालघरला ‘रेड’ तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज’ अलर्ट

    Moshi Garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट: ९ जणांची सुखरूप सुटका; अजूनही ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

    NIA Raids : महाराष्ट्रातील 3 ठिकाणांसह 9 राज्यांत 20 ठिकाणी एनआयएचे एकदाच छापे; ऑनलाइन कट्टरवाद व आरएसएस कार्यालय बॉम्बहल्ल्याच्या तपासाला वेग