Buldhana Bus Accident : पुरोगामी महाराष्ट्रात संजय राऊतांचा अंधश्रद्धा नॅरेटिव्ह; म्हणे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग “शापित”!!


प्रतिनिधी

मुंबई : बुलढाण्यानजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला भीषण अपघात होऊन बसणे पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. 8 प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातानंतर सर्व सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागून जखमींच्या बचाव करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा नॅरेटिव्ह पसरवत आहेत. Sanjay Raut’s Superstitious Narrative in Progressive Maharashtra

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा “शापित” असल्याचा जावई शोध संजय राऊत यांनी लावला आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या त्या शेतकऱ्यांच्या छापामुळेच समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत, असे अंधश्रद्धा पसरवणारे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे आणि संजय राऊत यांच्या या वक्तव्याला मराठी माध्यम शिंदे – फडणवीस सरकार वर केलेले टीकेचे स्वरूप देत आहेत.


Buldhana Bus Accident : खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला लागली डुलकी??; ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख पोलिसांच्या ताब्यात!!


समृद्धी महामार्गावरचा अपघात नेमका कसा झाला?, त्याविषयी पोलीस चौकशी करत आहेत. खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला डुलकी लागली?, याविषयी चौकशी सुरू आहे. पोलिसांनी बसचा ड्रायव्हर दानिश इस्माईल इस्माईल शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे. जखमींवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बस अपघाताची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधासाठी मानवी आणि तांत्रिक कोणत्या उपाययोजना करता येतील?, याची तातडीने चाचणी सुरू करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची खात्री त्यांनी दिली आहे.

पण या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना राजकीय टोमणे मारले आहेत. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हडपल्या. त्या शेतकऱ्यांचे “शाप” लागले म्हणूनच समृद्धी महामार्ग “शापित” आहे आणि तिथे अपघात होतात असा जावई शोध संजय राऊत यांनी लावला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार केलेला समृद्धी महामार्ग “शापित” असल्याचे अंधश्रद्धा ते पसरवत आहेत.

Sanjay Raut’s Superstitious Narrative in Progressive Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात