• Download App
    पवारांच्या भरवशावर 25 वर्षांच्या सत्तेची भाषा करणारे राऊत आता म्हणाले, सत्ता जाईल पण शिवसेना उभारी घेईल!!Sanjay Raut relentes, now says, Shivsena may lose power but will rise like a Phoenix

    पवारांच्या भरवशावर 25 वर्षांच्या सत्तेची भाषा करणारे राऊत आता म्हणाले, सत्ता जाईल पण शिवसेना उभारी घेईल!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या भाषेत आता बराच बदल झाला आहे. शरद पवारांच्या भरवशावर महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे चालेल अशी भाषा करणारे संजय राऊत आता 2.5 वर्षातच शिवसेनेची सत्ता जाईल. पण शिवसेना पुन्हा उभारी घेईल, असे वक्तव्य करताना दिसत आहेत. Sanjay Raut relentes, now says, Shivsena may lose power but will rise like a Phoenix

    शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ठाकरे – पवार सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदेंनी पक्षाविरोधात बंड पुकारले तेव्हापासून राज्यात राजकीय नाट्य घडताना दिसत आहे. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भाषेत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा राजकीय पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. पण सत्ता परत मिळवता येईल. पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असे बुधवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे.

    – शिंदेंना पक्ष सोडणे सोपे नाही

    आज बुधवारी सकाळी एकनाथ शिंदेंसोबत बोलणे झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आमच्यात तासभर चर्चा झाली. आमचं फोनवर बोलणं झाल्याची कल्पना मी उद्धव ठाकरेंना दिली आहे. पक्षाकडून त्यांच्याशी संवाद सुरू आहे. शिंदे हे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेचे काम केले असून शिंदेंना पक्ष सोडणे सोपे नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणे सोप नाही, त्यांची नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचे बंड शांत होईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

    राखेतून गरूड झेप घेण्याची शिवसेनेची ताकद

    पत्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल असं भाजपला वाटत असेल पण शिवसेनेत राखेतून गरूड झेप घेण्याची ताकद आहे, असे राऊत म्हणाले.

    Sanjay Raut relentes, now says, Shivsena may lose power but will rise like a Phoenix

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!