Rupali Patil : रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या- अजितदादांचा अपघात की घातपात? ऐनवेळी पायलट का बदलले? पाच मृत्यू तर सहावी बॉडी कुठे!

Rupali Patil

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rupali Patil अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे त्यांच्या विमान अपघातामागे काही घातपात आहे का याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तसेच अपघाताच्या दिवशी ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले असा सवालही ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.Rupali Patil

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, आज पाच दिवस झाले, आमचा मेंदू बधीर झाला आहे. अजित पवार सकाळी 8 वाजता ज्या विमानाने येणार होते, त्याचे पायलट आणि को पायलट दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ऐनवेळी बदलले गेले. ते का करण्यात आले? विमान खाली घेण्याची सूचना कोणी केली? आधी सहा माणसं या विमानात असल्याचे सांगितले गेले. मृत्यू पाच जणांचा झाला. मग सहावा माणूस कुठे गेला? असा प्रश्न ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.Rupali Patil



पुढे बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, लँडिंगच्या वेळी अडचण असताना ते विमान खाली घेण्याची सूचना कोणी दिली? अडचण असेल तर ते विमान पुणे, सोलापूर किंवा इतर ठिकाणी उतरवायला हवे होते. मात्र तसे न करता बारामतीमध्येच का उतरवले? विमान अपघातात सगळ्या बॉडी जळाल्या, पण कागदपत्रे तशीच राहिली. त्यामुळे हा अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे, याची चौकशी झालीच पाहिजे. आपण हा अपघात असल्याचे म्हणू आणि दुसरीकडे ज्याने हे कटकारस्थान केले आहे तो मोकाट सुटायला नको.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पाच दिवस उलटले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या पाच प्रश्नांनी संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दादा गेले हे मन मान्य करायला तयार नाही. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप मी करणार नाही, पण प्रश्नांचा आगडोंब उसळतोय, असे म्हणत अमोल मिटकरींनी थेट अपघाताच्या ठिकाणच्या विसंगतींवर आणि तपास यंत्रणांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Ajit Pawar Crash: Sabotage or Accident? Rupali Patil Questions Pilot Change

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात