• Download App
    विमान प्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल बंधनकारक : आरोग्यमंत्री राजेश टोपे RTPCR test report mandatory for air travel: Health Minister Rajesh Tope

    विमान प्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल बंधनकारक- आरोग्यमंत्री राजेश टोपे

    विशेष प्रतिनिधी

    जालना – विमान प्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल बंधनकारक आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. RTPCR test report mandatory for air travel: Health Minister Rajesh Tope

    आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अधिकाऱ्याची ओमीक्रोन संदर्भात बैठक घेतली या बैठकित कोरोना टेस्टिंग, ज्यूनिमिक सिकवेंसिंग लॅब वाढवणे, सर्व विमानतलावर १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना कवारंटाईन करणे,या व्हेरीयंट बद्दल जनजागृती करणे,लसीकरण वाढवन्याबाबत आदेश देण्यात आल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


    महाराष्ट्रात सध्या रुग्ण संख्येचा दर कमी , पहिली ते चौथीची शाळाही उघडायला हरकरत – राजेश टोपे


    मास्क वापरणं देखील वापरणं गरजेचं आहे. ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरीयंट पेक्षा ५ पटीने मोठी आहे असेही ते म्हणाले. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावर कवारंटाईन केलं जाणार असून RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

    औरंगाबाद,मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवासांसाठी RTPCR टेस्ट घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं.मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.सध्या राज्यात हा व्हेरीयंट नसल्याने सर्व शाळा सुरू करण्यात काहीच अडचणी नाही.

    RTPCR test report mandatory for air travel: Health Minister Rajesh Tope

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल