विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे दाखवत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरे यांना “करेक्ट” केले आहे. किंबहुना त्यांनी राज ठाकरे यांना आठवणच करून दिली आहे…!!, की अजित पवार यांच्या घरावर ईडीचे छापे पडलेले नाहीत. Raj Thackeray: No raids on Ajit Pawar’s house; Reminded by Supriya Sule !! … but to whom … ??
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरांवर ईडीचे छापे पडतात. त्यांच्या बहिणींच्या घरावर छापे पडतात, पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या घरांवर छापे पडत नाहीत, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी उत्तर सभेत केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणात “फॅक्च्युअल मिस्टेक्स” आहेत. अजित पवार यांच्या घरांवर ईडीचे छापे पडलेच नाहीत, अशी आठवण करून दिली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांची संबंधित नातेवाईकांच्या गुरू कमोडिटीज तसेच अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर ईडीने छापे घातले होते. राज ठाकरे यांच्या भाषणात हा संदर्भ होता. पण त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरांवर छापे पडले नसल्याची आठवण राज ठाकरे यांना करून दिली.
सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या घरावर ईडीचे छापे पडले नाहीत ही आठवण सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांना करून दिली…?? की ईडीच्या अधिकाऱ्यांना करून दिली…?? की अन्य केंद्रीय तपास संस्थांना करून दिली…??, असे खोचक सवाल राजकीय वर्तुळात एकमेकांनाच विचारण्यात येत आहेत. अजित पवारांबाबतच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांना नेमके काय सुचवायचे आहे?? आणि कोणाला सुचवायचे आहे??, असे सवालही विचारण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App