विशेष प्रतिनिधी
नागपूर : Fadnavis काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.Fadnavis
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जन सुरक्षा विधेयक तयार करण्यात आल्यानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्यावर संयुक्त चिकित्सा समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसला देखील या विधेयकावर कोणताही आक्षेप नव्हता. त्यानंतरच हे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे.Fadnavis
मात्र आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांपुढे कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे ते आता या जन सुरक्षा विधेयक विरोधात आंदोलन करत आहेत. राहुल गांधी यांना अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी घेरलेले आहेत. त्यामुळे ते अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त झाले असल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्यावर पुन्हा नाराजी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. पिक विमा संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्यात आली असून या संदर्भात स्पष्टिकरण देताना कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आधी वाद झाला त्या वेळी मी शेतकऱ्यांना भिकारी म्हणालो नव्हतो तर शेतकऱ्यांकडून एक रुपया घेणारे शासनच भिकारी असल्याचे म्हटले होते, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कृषि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.
शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचा सरकारचा निर्णय
या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, एक रुपयात पिक विमा योजनेत काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी त्याचा जास्तीचा फायदा कंपन्या घेत असल्याचे लक्षात आले. म्हणूनच याची पद्धती बदलली. मात्र त्याच बरोबर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये दर वर्षी शेतीत गुंतवणूक करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीही सुरुवात या वर्षीपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 25000 कोटी रुपये शेतीतील गुंतवणूक वाढवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Fadnavis Slams Congress: Rahul Gandhi ‘Ultra-Left’
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
- जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांना सत्यपाल मलिकांची झाली आठवण; पण कुणालाही नाही आठवले मधू लिमये!!
- CoinDCX : CoinDCX वर सायबर हल्ला: 380 कोटींची चोरी, क्रिप्टो गुंतवणुकीतील धोक्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
- ED Summons : सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या खटल्यात ईडीचे अपील फेटाळले; सुप्रीम कोर्टाचा सवाल- राजकीय लढायांसाठी ईडीचा वापर का केला जातोय?