कल्याण महापालिकेत शिवसैनिकांकडून राडा, कामकाज बंद करण्याचा प्रयत्न; पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी

विशेष प्रतिनिधी

कल्याण : कल्याण महापालिकेत शिवसैनिकांनी राडा घालून कामकाज बंद करण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावरून पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी पडली.Rada by Shiv Sainiks in Kalyan Municipal Corporation, attempt to stop work; Dispute erupts between police and Shiv Sainiks

महाराष्ट्रात बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करू सर्वत्र बंद पुकारला. मात्र नागरिकाच्या कामासाठी महापालिका उघडी असल्याने शिवसेनेच्या कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेत शिरुन कामकाज बंद करायचे आवाहन केले.



पालिका कर्मचाऱ्यांना ते बंद करण्याची ताकीद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावले. त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. मात्र महापालिकेमध्ये शिवसेनेचे अधिकृत युनियन असल्याने पोलिस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयात जाऊन बसले. सध्या महापालिका परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून युनियनमध्ये सहभागी असलेल्या काही कामगारांनी आंदोलनामध्ये सामील होत काम बंद केले.

Rada by Shiv Sainiks in Kalyan Municipal Corporation, attempt to stop work; Dispute erupts between police and Shiv Sainiks

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात