• Download App
    पुण्याची फुकटात बिर्याणीची मागणारी महिला आयपीएस अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलीसांना प्रतिमा बदलण्याचे आवाहन|Pune's female IPS officer demanding free biryani and Prime Minister Narendra Modi's appeal to the police to change the image

    पुण्याची फुकटात बिर्याणीची मागणारी महिला आयपीएस अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलीसांना प्रतिमा बदलण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुण्यातील एका महिल आयपीएस अधिकाऱ्या चे फुकटात बिर्याणी मागवियाचे प्रकरण ताजे आहेत. यावेळी लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Pune’s female IPS officer demanding free biryani and Prime Minister Narendra Modi’s appeal to the police to change the image

    सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात.



     

    ते कित्येक दिवस घरी जाऊ शकत नाहीत, सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते.पोलीसांच्या वास्तव प्रतिमेची जाणीव करून देताना पंतप्रधान म्हणाले, सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे.

    कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती कारण पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. तथापि, धारणा पुन्हा नकारात्मक झाली आहे. पोलीस दलात येणाऱ्या नव्या पिढीची ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी आहे.

    राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवे. कामगिरीवर असताना राष्ट्रहित कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात.

    Pune’s female IPS officer demanding free biryani and Prime Minister Narendra Modi’s appeal to the police to change the image

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा