प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला कडक इशारा, माझ्या आणि वंचितच्या नादाला लागू नका; आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट

Prakash Ambedkar's stern warning to Congress

विशेष प्रतिनिधी

अकोला : निवडणुकांमध्ये जागांचा समझौता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरणे कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.Prakash Ambedkar’s stern warning to Congress, don’t listen to me and Vanchit’s voice; We are experts in tearing clothes

वंचितच्या वतीने काल अकोलामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवरील भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आणि वंचितच्या नादाला लागू नका; आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनीही कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.



मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील नागरिक जे मुंबईमध्ये राहतात आणि जे दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मनसेच्या पाठिंब्यामुळे मुंबईचे गणित बदलले

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील, अशी शक्यता आम्हाला वाटत होती. आणि तसे झाले की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते, पण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली आहे. लवकरच ते निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar’s stern warning to Congress, don’t listen to me and Vanchit’s voice; We are experts in tearing clothes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात