अदर पूनावाला हे मिळणार्या धमक्यांमुळे महाराष्ट्रातून थेट विदेशात निघून गेले आता परत एकदा एक समाजसेवी डॉक्टर महाराष्ट्र सोडून जाणार.
ठाण्यातील डॉ. राहुल घुले यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. आपल्या जीवाला राजकीय एजंटपासून धोका असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वन रूपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुले हे दिल्लीमध्ये कायमस्वरुपी शिफ्ट होणार आहेत. राज्यातील काही राजकीय एजंटमुळे जीवाला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच जिवाला धोका असल्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणीसुद्धा केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘महाराष्ट्रातील काही राजकीय एजंट्सकडून (political agents) माझ्या जीवाला धोका आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) आपण मला मदत करावी. मी लवकरच काही नावं जाहीर करणार आहे.’ असं धक्कादायक ट्विट वन रुपी या क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले ((One rupee clinic founder Dr. Rahul Ghule) यांनी केलं आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या ट्विटने राज्यात एकच खळबळ माजली आहे. PM MODI PLEASE HELP: Danger from political agents-Leaving Maharashtra to Delhi forever; The founder of Thane’s One Rupee Clinic, Dr. Rahul Ghule’s sensational tweet
दरम्यान, यासोबतच त्यांनी दुसरं ट्विट असं देखील केलं आहे की, ‘मी माझ्या आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह मुंबई/ठाणे सोडून कायमचा दिल्लीला जात आहे.’ त्यामुळे डॉ. राहुल घुले यांच्या जीवाला नेमका कुणापासून धोका आहे याबाबत देखील चर्चा सुरु झाली आहे.
कोरोना काळात डॉ. राहुल घुले यांच्या नावाची बरीच चर्चा होती. कारण रुग्णांकडून एक रुपया घेऊन आपण त्यांच्यावर उपचार करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. याशिवाय त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर वन रुपी क्लिनिकची देखील सुरुवात केली होती.
दरम्यान, कोरोनाच्या संकटात त्यांनी कोव्हिड सेंटर चालू केले होते जिथे तब्बल 2500 पेक्षाही अधिक बेड होते. यामुळे ठाण्यात डॉ. राहुल घुले हा एक चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, आज (13 जून) अचानक त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर काही धक्कादायक दावे केले आहेत.
एक क्लिनिक सुरु केलं होतं. जे शासनाच्या मदतीने सुरु होतं. त्या संदर्भातील बिल काढण्याची मागणी केली गेली होती. हेच बिल काढण्यासाठी त्यांच्याकडे तब्बल 50 लाख रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
“माझी पत्नी भीतीने काळजीपोटी रडत आहे”
राहुल घुले यांनी आपल्या ट्विटमध्ये काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत “माझी पत्नी भीतीमुळे रडत आहे. तुमच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे. पण काही राजकीय एजंटमुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मी मुंबईहून दिल्लीत कायमस्वरुपी शिफ्ट होणार आहे,” असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App