• Download App
    निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी पवारांची वातावरण निर्मिती; खर्गेंच्या घरी जाऊन घेतली राहुल गांधींची भेट!!|Pawar creates atmosphere before Election Commission hearing; Rahul Gandhi visited Khargen's house!!

    निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी पवारांची वातावरण निर्मिती; खर्गेंच्या घरी जाऊन घेतली राहुल गांधींची भेट!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी खरी कोणाची??, या विषयावर निवडणूक आयोगात सुनावणी होण्यापूर्वी शरद पवारांनी राजकीय वातावरण निर्मिती करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरे यांच्या घरी जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करून “इंडिया” आघाडी एकजूट करून भाजपला पराभूत करेल, असा दावा केला.Pawar creates atmosphere before Election Commission hearing; Rahul Gandhi visited Khargen’s house!!

    पण राजधानी नवी दिल्लीत फार मोठी घडामोड घडल्याची बातमी करत शरद पवार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचल्याचे मराठी माध्यमांनी नमूद केले. त्यानंतर तिथे राहुल गांधी पोहोचले. शरद पवारांबरोबर जितेंद्र आव्हाड आणि राहुल गांधी यांच्या समवेत माणिकराव ठाकरे होते. या सर्व नेत्यांनी साधारण अर्धा पाऊण तास चर्चा केल्यानंतर शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे रवाना झाले. तिथे प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी शरद पवार हजर राहिले. या सुनावणीपूर्वी अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजितनिष्ठ राष्ट्रवादीकडे 43 आमदार असल्याचा दावा केला.



    शरद पवार केवळ स्वतःच्या सहीने परस्पर नेमणुका करतात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष घटनेला धरून होत नसते, असा युक्तिवाद अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.

    शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या बरोबर देशभरातले 24 प्रदेशाध्यक्ष आणि बहुसंख्या पदाधिकारी असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला आणि निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी त्यांनी अजित पवारांबरोबर गेलेले 9 आमदार निलंबित करावेत, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला.

    या पार्श्वभूमीवर आपण खरंच अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढणार आहोत, याची काँग्रेस नेतृत्वाला खात्री करून देण्यासाठी शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी राहुल गांधींशी चर्चा केली. या चर्चेचा निष्कर्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी “इंडिया” आघाडीची एकजूट आणि भाजप पराभूत, असा काढला असला तरी प्रत्यक्षात शरद पवार हे खरंच अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसशी लढत आहेत किंवा कसे याची चाचपणी करण्यासाठीच खर्गेंच्या घरची बैठक होती हे मात्र स्पष्ट झाले.

     नुसत्याच बैठका, जोर नाहीच

    आत्तापर्यंत “इंडिया* आघाडीच्या तीन महाबैठका झाल्या. त्यानंतर शरद पवारांच्या घरी समन्वय समितीची बैठक झाली आणि त्यानंतर आज मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी ते स्वतः, शरद पवार आणि राहुल गांधी यांची बैठक झाली, पण अजून “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांची जागावाटपाची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे अशा बैठकीतून फक्त वातावरण निर्मिती केली जाते. प्रत्यक्ष प्रचाराला आणि जागावाटपाला जोरच येत नाही हे दिसून आले.

    Pawar creates atmosphere before Election Commission hearing; Rahul Gandhi visited Khargen’s house!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक