ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक ‘टोळी’ निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. त्यातच, मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे नाराजीनाट्य उघडपणे पाहायला मिळाले आणि अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आरक्षण लढ्यासंदर्भातील स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. दरम्यान, या कार्यक्रमावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मोदीजी लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतात, तेव्हा विकासाच्या नवनव्या वाटा खुल्या होतात. मोदी हात लावतात तिथं सोनं होतं; मोदी है तो मुमकीन है, अशा शब्दांत शिंदे यांनी मोदींच्या कामाचा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.
शेतकरी कामगार पक्षासारख्या डाव्या कम्युनिस्ट चळवळीत संपूर्ण राजकीय आयुष्य घालविलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव राज्यातल्या भाजप महायुतीच्या सरकारने दिले
काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रमुख निर्णय हे तुकडा बंदी अधिनियम सुधारणा आणि झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये क्लस्टर योजना लागू करण्यासंदर्भात आहेत. तुकडा बंदी अधिनियमातील सुधारणेमुळे महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर दुसऱ्या निर्णयानुसार एसआरएमध्ये क्लस्टर योजना राबवण्यास मंजुरी मिळाली आहे. या दोन महत्त्वाच्या निर्णयांसह बैठकीत इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भुजबळ यांनी जरांगे यांच्या ‘अभ्यास’, ‘शिक्षण’ आणि ‘मराठ्यांचे नेतृत्व’ यावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.
राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठे पॅकेज देण्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज अनेक धोरणात्मक निर्णय घेतले त्यामध्ये तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा आणि मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास या दोन महत्त्वपूर्ण निर्णय यांचा समावेश आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणून केला. विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचे शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसींनी यावर चिंतन केले पाहिजेत. या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे, असे ते म्हणालेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता बीड कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले असून कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयाचे आमिष दाखवले जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
पुणे महापालिकेतली प्रभाग रचना करताना भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातल्या दादागिरीला चांगलाच कोलदांडा घातला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याीतल नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली. या प्रक्रियेनंतर 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
राज्यात आर्थिक ओढाताण अधिक तीव्र होत चालली असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यांसारख्या योजनांवरील निधीअभावाची स्पष्ट कबुली दिली आहे. “लाडकी बहीण योजना 35 ते 40 हजार कोटी रुपयांवर जाते, त्यामुळे काही गोष्टी यंदा करता येणार नाहीत,” असे सांगत भुजबळ यांनी सरकारच्या आर्थिक मर्यादांचा उल्लेख केला. निधीअभावामुळे योजनांमध्ये ओढाताण होणार असल्याचेही भुजबळ म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायवस्थेचाच नव्हे तर लोकशाही, संविधान व संपूर्ण देशाचा घोर अवमान आहे, असे ते म्हणालेत. राज्यातील इतरही अनेक नेते तथा प्रतिष्ठित व्यक्तींनी गवईंवर त्यांच्या न्यायदालनात झालेल्या कथित हल्ल्याचा जोरकस शब्दांत निषेध केला आहे.
मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??, असा सवाल मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे समोर आला. गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आणि मनोज जरांगे यांची आजची शरद पवारांवर थेट टीका यामुळे राजकीय संशय अधिक गडद झाला.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) मुंबईत 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने अजित पवारांच्याही राजकारणाचा देव्हारा बसवायची भाषा करणारे मनोज जरांगे आज फिरले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज वक्तव्य केले.
इंडिया शब्द मनातून काढून टाकून मन, वचन व कर्म या तीनहीमध्ये भारत बनवायचा आहे. भारतीय ज्ञान संपदेला केवळ शिक्षण क्षेत्रात नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात लागू करायचे.
एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App