विशेष प्रतिनिधी
अब्राह्मणी स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यासक सरोज कांबळे यांची त्यांचाच मुलगा इनायत परदेशीने हत्या केली. मुख्य प्रवाहातल्या प्रसार माध्यमांनी ही बातमी दडपली. पण सोशल मीडियात मात्र या बातमीवरून काहूर माजले. डावा लिबरल मीडिया याबाबत मूग गिळून गप्प बसला, या पार्श्वभूमीवर डावे संस्कार आणि संघ संस्कार यातला भेद प्रख्यात लेखिका शेफाली वैद्य यांनी ही फेसबुक पोस्ट लिहून विशद केला आहे. On the occasion of Inayat Pardeshi… read the difference between the two rites
ती कालची इनायत परदेशीची बातमी काही डोक्यातून जात नाहीये. ह्याची आई आणि बाप दोघेही म्हणे लढवय्ये स्त्रीमुक्तीवादी आणि परिवर्तनवादी वगैरे होते. मग साधं घरात परिवर्तन नाही करता आलं? जगाला स्त्रीमुक्तीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या सरोजिनी कांबळेबाईंना स्वतःच्या घरात स्वतःच्या पोराला स्त्रियांचा आदर करायला शिकवता नाही आलं?
सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलगा इनायत परदेशीकडून प्रॉपर्टीसाठी हत्या; बऱ्याच शोधा नंतर पोलिसांपुढे हजर
इनायत आई-वडीलांचा बऱ्याच काळापासून छळ करत होता आणि ही गोष्ट ‘परिवर्तनवादी चळवळीतल्या’ बऱ्याच लोकांना माहिती होती तर मग त्यांनी ह्या अन्यायाविरुद्ध काहीच का केलं नाही? ह्या सरोजिनी बाईंनी अनेक कुटुंबे स्त्रीमुक्तीच्या नावाखाली उध्वस्त केली असणार, पण स्वतःच्या घरात त्यांना थोडाही प्रतिकार नाही करता आला?
परदेशी दाम्पत्याने म्हणजे अनेक परिवर्तनवादी कार्यकर्ते तयार केले, मग जेव्हा त्यांना गरज होती मदतीची तेव्हा हे सगळे कार्यकर्ते कुठे दडून बसले? कुणीच कसं पुढे आलं नाही? ही डावी चळवळवाली मंडळी कुटुंब, नाती वगैरे गोष्टीत विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे कुटुंबातले इतर लोक ह्यांच्या वाटेला फारसे जात नाहीत, पण ह्यांचे स्वतःचे कार्यकर्ते कुठे गेले? मागे अनंत आणि पुष्पा भावे यांच्या संदर्भातही अशीच बातमी वाचली होती की त्यांच्या म्हातारपणी त्यांच्यावर उपचार करायला पैसे नव्हते म्हणून त्यांच्यासाठी फंड काढावा लागला होता, जो त्यांच्याच घरून कोणी चोरून नेला!!
ह्या डाव्या चळवळीतल्या बऱ्याच लोकांचं म्हातारपण असंच वैफल्यग्रस्त असतं. ह्याउलट संघ परिवारातल्या लोकांची परिस्थिती असते. म्हातारपण आणि त्यासंदर्भात येणाऱ्या व्याधी त्यांनाही सोसाव्या लागतात, पण व्यवस्था त्यांची काळजी घेते. मला असे काही पूर्णवेळ संघ प्रचारक माहिती आहेत की ज्यांच्या म्हातारपणी त्यांचे स्वतःचे कुटुंब करणार नाही इतक्या प्रेमाने त्यांची काळजी संघ परिवार घेतो. त्यांचं उमेदीचं आयुष्य त्यांनी देशासाठी, धर्मासाठी, संघटनेसाठी दिलेलं असतं ह्याची जाणीव ठेवून त्यांची काळजी घेतले जाते.
हा संस्कारांमधला फरक आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App