• Download App
    शिवनेरीवर अजितदादांच्या शिवजयंतीच्या भाषणात मराठा आरक्षणावरून अडथळा; अजितदादांनी तरुणाला सुनावले... । Obstacle to Maratha reservation in Ajit Dad's Shiva Jayanti speech on Shivneri; Ajit Dad told the youth ...

    शिवनेरीवर अजितदादांच्या शिवजयंतीच्या भाषणात मराठा आरक्षणावरून अडथळा; अजितदादांनी तरुणाला सुनावले…

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : किल्ले शिवनेरी वरील शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर तेथील भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजितदादा संतापलेले दिसले. Obstacle to Maratha reservation in Ajit Dad’s Shiva Jayanti speech on Shivneri; Ajit Dad told the youth …

    तू कोणाची सुपारी घेऊन आलास काय?, अशी विचारणा अजितदादांनी त्याला केली. त्याच वेळी मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे मराठ्यांच्या पोटचे नाही का? आम्हाला जातीचा अभिमान नाही का? परंतु शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की सर्वांना, सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाचे काढून घेऊन नव्हे, तर सर्व समाजांना बरोबर घेऊन सर्वांना न्याय मिळवून आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे असे अजितदादा म्हणाले.



    केंद्र सरकारने काही नियमांमध्ये बदल करावे लागतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत गुरु उल्लेखिलेले मंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते.

    अजित दादांचे हे भाषणाचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रमानंतर देखील पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी तिची भूमिका स्पष्ट केली मराठा आरक्षण हे पिक्चर कोणाच्या आरक्षण काढून घेऊन नव्हे तर सर्वांना न्याय देऊनच मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

    Obstacle to Maratha reservation in Ajit Dad’s Shiva Jayanti speech on Shivneri; Ajit Dad told the youth …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !