विशेष प्रतिनिधी
नागपूर : OBC Protest नागपुरात सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित बैठकीत ओबीसींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन करण्यात आले असून, या बैठकीत 17 फेब्रुवारी रोजी नागपुरात भव्य आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.OBC Protest
या बैठकीत विदर्भातील प्रमुख ओबीसी संघटनांनी जातीनिहाय जनगणनेतील तांत्रिक त्रुटींवर तीव्र असंतोष व्यक्त केला. प्रामुख्याने घरसूची प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 12 मध्ये ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजाच्या घटनात्मक हक्कांवर भविष्यात गदा येण्याची शक्यता बैठकीत वर्तवण्यात आली. यासोबतच यूजीसीच्या नव्या धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली असून, या सर्व तांत्रिक आणि धोरणात्मक त्रुटींच्या निषेधार्थ 17 फेब्रुवारीला आंदोलनाचा एल्गार पुकारला जाणार आहे.OBC Protest
संविधान चौकातून धरणे आंदोलन सुरू
या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जनगणनेच्या संदर्भात तसेच यूजीसीच्या संदर्भात आमच्यात चर्चा झाली. ओबीसीची जनगणना होणार नसेल तर हे अन्यायकारक आहे. सरकारकच्या दरवाजात या सगळ्याच्या विरोधात 17 तारखेला आम्ही संविधान चौकातून धरणे आंदोलन सुरू करणार आहोत. या जनगणनेमध्ये जोपर्यंत ओबीसीचा समावेश होत नाही, तोपर्यंत मोठे आंदोलन या देशात उभारले जाणार आहे. या पलीकडे जाऊन ओबीसी संमेलन देखील आम्ही आयोजित करणार आहोत.
कुठल्याही राजकीय बॅनरखाली हे आंदोलन नाही
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, या आंदोलनात मोठ्या संख्येने येतील. 17 तारखेपासून ही सुरुवात होणार आहे. ज्यांना ज्यांना यायचे आहे ते येतील. याला राजकीय स्वरूप देता येणार नाही. ओबीसीच्या हक्कासाठी तिथे यायचे आहे. कुठल्याही राजकीय बॅनरखाली हे आंदोलन नाही. ओबीसीच्या हक्काचे मिळाले तर त्यांचे जे आताचे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न दूर होतील.
सीईटी परीक्षेत महिलेला मंगळसूत्र काढणाऱ्यास जोडे मारावे
तसेच सीईटीच्या परीक्षेत मंगळसूत्रामुळे एका महिलेला परीक्षेपासून वंचित राहावे लागले. याविषयी विचारले असता, विजय वडेट्टीवार म्हणाले, मला हा विषय संपूर्ण माहित नाही. परंतु, असे झाले असेल तर ज्याने कोणी असे कृत्य केले आहे त्याला जोडे मारावेत, जो कोणी जोडे मारेल त्याला 25 हजारांचे बक्षीस वगैरे देऊ आम्ही. मंगळसूत्र घातल्याने परीक्षेला बसू दिले जात नसेल तर हे अत्यंत चिंताजनक आहे, म्हणजे लग्नानंतर मुलींनी शिकायचे नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
एसटी, एससी आणि ओबीसी हा क्लॉज कायम ठेवावा- डॉ. सुखदेव थोरात
यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यावेळी बोलताना म्हणाले, ओबीसीला अदर कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले आहे. त्यांचा ओबीसी म्हणून समावेश असावा. दूसरा मुद्दा जो आहे यूजीसीचा, त्यात जातीत भेदभाव जो आहे, एसटी, एससी आणि ओबीसी हा क्लॉज कायम ठेवावा. त्यानंतर जातीच्या आधारावर जो भेदभाव होतो त्याची जी लिस्टिंग ती कायम ठेवावी. आणि 2026 च्या कायद्याला सुधारित करून त्याला लागू करावे. यासाठी महाराष्ट्रातून आंदोलन उभे करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App