विशेष प्रतिनिधी
बीड : Chhagan Bhujbal ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पवार कुटुंब जातीयवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. त्यांनीच छगन भुजबळांना तुरुंगात पाठवले. त्यांची धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती, असे ते म्हणालेत.Chhagan Bhujbal
नवनाथ वाघमारे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वरील आरोप केला आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडे हे एक आक्रमक व अभ्यासू ओबीसी नेते आहेत. त्यांना जाणिवपूर्वक मंत्रिपद मिळू नये व त्यांचे राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त व्हावी यासाठी सुप्रिया सुळेंनी त्यांच्याविरोधात मीडिया ट्रायल चालवली. सुप्रिया यांना मुंडेंचा राजीनामा हवा होताच. पण त्यांना तुरुंगात डांबण्याचीही त्यांची इच्छा होती.Chhagan Bhujbal
पवारांनीच भुजबळांना तुरुंगात पाठवले
सुप्रिया सुळे यांचे बंधू म्हणजे अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला. तेव्हा त्या गप्प का गप्प होत्या? त्यांनी स्वतःच्या भावाविरोधात आंदोलन का केले नाही? पार्थ पवार यांनी महार वतनाची जमीन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी त्यांना क्लीनचिट दिली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठवण्यामागे शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेच षडयंत्र होते. पवार कुटुंब जातीवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. सुप्रिया सुळे यांचा पक्ष आता संपला आहे. ओबीसी समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात त्यांचा पक्ष होत्याचा नव्हता होईल, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.
ओबीसींचे आमदार वाढले, मराठा समाजाचे घटले
नवनाथ वाघमारे यांनी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे लोकप्रतिनिधी वाढल्याचाही दावा केला. ते म्हणाले, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे 39 आमदार वाढले. तर मराठा समाजाचे 18 कमी झाले. आगामी काळात आम्ही ओबीसींचे 100 आमदार वाढवू व मराठ्यांचे तेवढेच कमी करू. आमदार रोहित पवार व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी घेतली होती अमित शहांची भेट
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्रात माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकारमधील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. या रिक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी मुंडे यांनी दिल्लीतून फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केल्यास आपण बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसू असा इशारा दिल्यामुळे वातावरण तापले आहे.
OBC Leader Navnath Waghmare Attack Sharad Pawar Chhagan Bhujbal Dhananjay Munde Jail Claim Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!
- China Building : बांगलादेशात चीन उभारतोय एअरबेस आणि पाणबुडी तळ; संसदीय समितीचा अहवाल
- शालिनीताई पाटील : काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या!!
- पुणे, पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना आबा बागुल मात्र शिंदे सेनेत!!