• Download App
    chhagan bhujbal | The Focus India

    chhagan bhujbal

    Chhagan Bhujbal : इतरांची मुलं मंत्री, तोच न्याय मला लावा; राज्यसभा उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले- मी नाराज नाही, भाजपनेही मला विरोध केला नाही

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असला, तरी या निर्णयामागील राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या जागेसाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव होते राज्याचे मंत्री छगन भुजबळ. शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली आणि विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांची निवड झाली.

    Read more

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या घराणेशाहीचा “न्याय”!!, हेच राजकीय सत्य छगन भुजबळ यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आले.

    Read more

    राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे; रोहित पवारांपासून छगन भुजबळांच्या पर्यंत सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकलेले!!

    राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे; रोहित पवारांपासून छगन भुजबळांच्या सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकलेले!!, हेच राजकीय चित्र राज्यसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले.

    Read more

    Chhagan Bhujbal : ‘आमच्यात कोणताही वाद नाही’; महायुतीतील जागावाटपावरून सुरू चर्चांदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र

    महायुतीतील विधान परिषद जागावाटप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांदरम्यान अखेर ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal आणि प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare माध्यमांसमोर एकत्र आले. “हम साथ-साथ आहेत, आमच्यात कोणताही वाद नाही,” असे सांगत दोन्ही नेत्यांनी मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

    Read more

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामु्ळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे; मंत्री छगन भुजबळ यांची मराठी सक्तीवर भूमिका

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना टाळण्याच्या भूमिकेचेही स्वागत केले.

    Read more

    Chhagan Bhujbal : कदाचित 3 महिन्यांनी LPG बंद होईल; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे मोठे विधान; PNG गॅसच्या जोडण्या वाढवण्यावर दिला भर

    राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान केले आहे. सध्या पीएनजी गॅस स्वस्त पडत आहे. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. केंद्राच्या एका पत्रकात 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत.

    Read more

    Chhagan Bhujbal : LPGचे उत्पादन 11 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवले; केरोसीन पुन्हा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न

    राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. “देशात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. एलपीजीचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनापर्यंत वाढवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन रांगा लावण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला असून आतापर्यंत ३३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Chhagan Bhujbal : परिस्थिती गंभीर, पर्याय म्हणून केरोसिन वापरा; नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा अजब सल्ला

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मदतीसाठी राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. मात्र, सध्या जगभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यावर तातडीने उपाय करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका, म्हणाले – विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असते

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या दाव्यावर भुजबळांचा टोला- उपमुख्यमंत्री कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरले असेल

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या मते, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले- विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही, सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड करणे यालाच आमचे प्राधान्य

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नसल्याच स्पष्ट केले आहे. रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे का? ही चर्चा आज, उद्या, महिना किंवा 2 महिन्यांनीही करता येईल. या प्रकरणी घाई करण्याची काहीच गरज नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    Chhagan Bhujbal : तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना; भुजबळांचे शाहांना पत्र, कारवाई करण्याची मागणी

    तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महात्मा फुलेंचा अपमान हा देश कदापि सहन करणार नाही,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी इशारा दिला आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल, छगन भुजबळांचे विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

    Read more

    Anjali Damania : भुजबळांना मिळालेल्या क्लीन चीटवर अंजली दमानियांचा संताप, हायकोर्टात जाण्याचा निर्णय

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) केसमध्येही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. “छगन भुजबळांवरील सर्व प्रकरणे संपलेली नाहीत, त्यांना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही. आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

    Read more

    Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा; ACB नंतर आता EDच्या प्रकरणातही निर्दोष सुटका

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) छगन भुजबळ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासाअंती आता ईडीने छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा दावा- शरद पवारांनीच भुजबळांना तुरुंगात पाठवले; धनंजय मुंडेंनाही पाठवण्याची होती इच्छा

    ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पवार कुटुंब जातीयवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. त्यांनीच छगन भुजबळांना तुरुंगात पाठवले. त्यांची धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती, असे ते म्हणालेत.

    Read more

    Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, असे भुजबळ म्हणाले होते. आता यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटलांची बाजू घेतली. जीआरचा निर्णय हा वैयक्तिक नसून समितीचा सामूहिक निर्णय होता. त्यामुळे कोणालाही टार्गेट करणे योग्य नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

    Read more

    Pankaja Munde : बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या- भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी

    बीड जिल्ह्यात नुकताच झालेला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा गाजला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी सरकारवर आणि विशेषतः मराठा आरक्षणाच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. भुजबळांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाविषयी विचारले असता, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी त्यांची भाषणे पाहिली नाहीत, थोड्या वेळाने पाहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच भुजबळ साहेबांनी त्यांची बाजू मांडली असावी, असेही त्या म्हणाल्या.

    Read more

    Vijay Wadettiwar : भुजबळांच्या व्हिडिओवर वडेट्टीवारांचा पलटवार; ते ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात- विजय वडेट्टीवार

    मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांची आपसातच जुंपली आहे. मराठ्यांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वच ओबीसी नेत्यांचे एकमत आहे. असे असले तरी दुसरीकडे ते एकमेकांना टार्गेटही करीत आहेत. शुक्रवारी बीड येथे झालेल्या ओबीसीच्या मोर्चात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक जुना व्हीडीओ दाखवला. त्याला शनिवारी पत्रकार परिषदेतून वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

    Read more

    Chhagan Bhujbal : भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाने व्यक्त केला संशय; मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला

    बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आक्रमकपणे पार पडल्यानंतर, आता या मेळाव्यातील वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केल्यामुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला देत, त्यांच्या जामिनाबाबतही सूचक विधान केले आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil, : ओबीसी आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? मंत्री विखे पाटील यांचा सवाल; OBC नेत्यांना राईचा पर्वत न करण्याचा सल्ला

    मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षण कमी होतंय किंवा जाणार आहे अथवा कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही? असे ते म्हणालेत.

    Read more

    Babbanrao Taywade : वडेट्टीवारांनी भूतकाळात चूक केली, पण ती सभेत दाखवणे योग्य नव्हते, तायवाडेंचा भुजबळांना सल्ला

    मंत्री छगन भुजबळ हे समाजाचे मोठे नेते आहेत. एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या ओबीसी नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे योग्य नाही, भुजबळ यांनी तसे करायला नको होते, असे म्हणत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : मी शत्रू नव्हतो, तरीही भुजबळांनी मला का टार्गेट केलं?, विजय वडेट्टीवारांचा सवाल, मराठा-ओबीसी वादावरून सरकारवर हल्लाबोल

    बीडच्या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मला का टार्गेट केले? मी तर कधीच त्यांचा शत्रू नव्हतो. त्यांचा विरोध केला नाही, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. मला निमंत्रण नव्हते, माझ्या मतदारसंघात काम होते म्हणून मी मोर्चाला जाऊ शकलो नाही म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांना सवाल केला आहे.

    Read more

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- भुजबळांची विखेंवर टीका हे मुख्यमंत्र्यांना आव्हान; भुजबळांना अजित पवार अन् फडणवीसांनी नव्हे तर मोदींनी मंत्री केले

    छगन भुजबळ यांना काही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वत:ला ओबीसींचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    Read more