Dhananjay Munde : रोज 16 तास काम, नकार दिला की इलेक्ट्रिक शॉक! म्यानमारच्या छळछावणीत महाराष्ट्राचे तरुण ओलीस, सुटकेसाठी धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सोशल मीडियावर मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर छळछावण्यांमध्ये अडकवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.