विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. या प्रकरणी केवळ संभ्रम व अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9 हजार मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत, असे ते म्हणालेत.Chhagan Bhujbal
इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाशी संबंधित नियमावली जाहीर केली आहे. त्यात प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा? यासंबंधी स्पष्ट केले आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्र व इतर काही क्षेत्रांना 100 टक्के, तर इतर घटकांना 70 ते 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण त्यानंतरही सर्वसामान्यांमधील गॅसच्या पुरवठ्याविषयी असलेली भीती संपली नाही. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोक्त आवाहन केले आहे.Chhagan Bhujbal
गत 6 महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलिंडर उपलब्ध
छगन भुजबळ शनिवारी एका पोस्टद्वारे म्हणाले की, आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने मी जनतेला करत आहे.
राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे.
गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App