प्रतिनिधी
मुंबई : अनेक विषयांवर वादग्रस्त मते व्यक्त करून कायम प्रसार माध्यमांमध्ये राहणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या संदर्भात एक नवा राजकीय वाद तयार झाला असून अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी त्यांच्यावर अनेक महिलांशी संबंध असल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे. NCP MLA Amol Mitkari has immoral relations with many women
मूळात शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरी यांच्यावर कमिशन खोरी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच केला होता. या आरोपांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता. एका आदिवासी शिक्षिकेने महिलेने शिवा मोहोळ यांच्यावर शोषण केल्याचा आरोप केला होता या आरोपानंतर देखील शिवा मोहोड आक्रमक असून त्यांनी अमोल मिटकरी यांच्यावरच पलटवार करत अमोल मिटकरी यांचे अनेक महिलांचे अनैतिक संबंध असल्याचा प्रत्यारोप केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी अमोल मिटकरींचा अनेक वेळा चौरंगा केला असता असे खळबळजनक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. अमोल मिटकरी यांच्यावर आधीच शिवा मोहोड यांनी अकोल्यात 80 लाख रुपयांचा प्लॉट घेतला. ते 30 लाखाच्या गाडीतून फिरतात मग ते गरीब कसे?, शिवाजी महाराजांचे पोवाडे सांगून त्यांनी आमदारकी मिळवली पण नंतर भ्रष्टाचारच केला, असा आरोप केला होता. त्यावर अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रत्यारोप केला होता.
आता त्यानंतर शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरी नोट चारित्र्य विषय एकच प्रत्यारोप करून त्यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. पातुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकारी तसेच एका काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याशी अमोल मिटकरी यांचे अनैतिक संबंध आहेत. यापैकी पातूरचे प्रकरण फार गाजले होते. संबंधित महिला पदाधिकारी राष्ट्रवादीचा अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटली देखील होती.
परंतु अमोल मिटकरींनी कसेबसे ते प्रकरण मिटवले. ते पाया पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे, असे शिवा मोहोड यांनी सांगितले आहे. काँग्रेस अशा एका महिला पदाधिकाऱ्याबरोबर देखील अमोल मिटकरी यांचे अनैतिक संबंध आहेत इतकेच नाही तर निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना पुण्यातली राष्ट्रवादीची एक महिला पदाधिकारी अकोल्यात तीन दिवस विश्रामगृहावर मुक्कामाला कशी होती?, हे अमोल मिटकरींनाच विचारा, असा पलटवार देखील शिवा मोहोड यांनी केला आहे.
येत्या 10 दिवसांत अमोल मिटकरींनी आपल्यावरचे आरोप मागे घेतले नाहीत अथवा पुरावे दिले नाहीत तर त्यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन अमोल मिटकरी यांचा अनैतिक संबंधांचा पर्दाफाश करणारे पुरावे आपण देऊ, असे शिवा मोहोड यांनी म्हटले आहे. शिवा मोहोड यांच्या पलटवारावर अमोल मिटकरी आता काय उत्तर देणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App