पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नवाब मलिकांची पीएम मोदींवर टीका, म्हणाले- मोदीजी आता कुणाच्या नशिबाने भाव वाढवत आहेत. तुमच्या की जनतेच्या?

NCP Leader Nawab Malik Criticizes Modi Govt On Petrol Disel Price Hike

NCP Leader Nawab Malik : मागच्या काही महिन्यांपासून इंधन तेलांमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. देशातील जवळजवळ 31 राज्यांत इंधन तेलाचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रावर टीका केली आहे. मलिक म्हणाले की, मेरे नशीबसे दाम कम हो रहे है असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशिबाने की जनतेच्या नशिबाने? कोण बदनशीब आहे. देशातील जनता की तुम्ही याचं उत्तर मोदींनी द्यावे! NCP Leader Nawab Malik Criticizes Modi Govt On Petrol Disel Price Hike


प्रतिनिधी

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून इंधन तेलांमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. देशातील जवळजवळ 31 राज्यांत इंधन तेलाचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रावर टीका केली आहे. मलिक म्हणाले की, मेरे नशीबसे दाम कम हो रहे है असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशिबाने की जनतेच्या नशिबाने? कोण बदनशीब आहे. देशातील जनता की तुम्ही याचं उत्तर मोदींनी द्यावे!

आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशात पेट्रोल – डिझेलच्या मुद्दयावर भाजपने निवडणूक लढवली. अब की बार मोदी सरकार बोलत सत्तेवर आल्यानंतर काही काळ भाव कमी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी मेरे नशीबसे दाम कम हो रहे है तो विपक्ष को क्यू बुरा लगता है, आपको नशीबवाला चाहिए की बदनशीबवाला चाहिए, असे बोलून मोदींनी विरोधकांना डिवचले होते. दरम्यान, हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

जम्मू-काश्मिरात होत असलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येवर मलिक म्हणाले की, गेली सत्तर वर्षे असेच सर्वांना वाटत होते की, काश्मीरच्या विशेष दर्जामुळेच तेथे परिस्थिती बिघडलेली आहे. मोदी सरकारने कलम 370 काढून विशेष दर्जा काढून टाकला. पण तरीही निष्पाप नागरिकांच्या हत्या होत आहेत. मोदी सरकारकडे दोन वर्षांपासून तिथला ताबा आहे, तरीही हे सर्व होत आहे.

NCP Leader Nawab Malik Criticizes Modi Govt On Petrol Disel Price Hike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात