राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांची भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!

BJP in PCMC

नाशिक : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांमध्ये भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.NCP corporators surrenders infront of BJP in PCMC

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एकमेकांशी भांडायला लागले. त्यात शरद पवारांनी सुद्धा उडी घेतली, पण अजित पवारांचे नेते बधले नाहीत. त्यांनी एकीकरणाचा विषय स्वीकारला नाही. तो विषय हाणून पाडला. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये घमसान झाले.

– नगरसेवक टिकवता नाही आले

पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना आपणच निवडून आणलेले नगरसेवक आपल्याच पक्षात टिकवून धरता आले नाहीत. मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे मिळून 4 नगरसेवक निवडून आले, ते सगळे शिंदे गटात गेले. त्यांनी शिंदे गटाबरोबर आपली एकत्रित नोंदणी केली. त्यामुळे मुंबई महापालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. ते भाजपने किंवा बाकी कुठल्याही पक्षांनी संपुष्टात आणले नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीच संपुष्टात आणले.



– 36 नगरसेवकांचा भाजपशी टक्कर घ्यायला नकार

त्यापलीकडे जाऊन या दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवडची महापालिका निवडणूक लढवली होती. 36 नगरसेवक निवडून आणले होते. या 36 नगरसेवकांनी आज भाजपच्या पुढे नांगी टाकली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक लढवायची नाही असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे भाजपने दिलेला महापौर पदाचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली.

– भाजपपुढे शरणागत पक्ष

वास्तविक 36 नगरसेवक हा काही लहान सहान आकडा नाही. 36 नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहात मोठी भूमिका बजावली असती भाजपच्या अनेक निर्णयांना ते लगाम घालू शकले असते. भाजपा बरोबर त्यांनी संघर्ष केला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसची एक संघर्षशील पक्ष म्हणून संपूर्ण राज्यात प्रतिमा उभी राहू शकली असती. पण प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एकमेकांशी भांडत असताना पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र भाजपच्या पुढे नांगी टाकली. त्यांनी भाजपशी दोन हात करायला नकार दिला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींची प्रतिमा भाजपपुढे शरणागत पक्ष अशी तयार झाली.

NCP corporators surrenders infront of BJP in PCMC

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात