वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाची अर्थात ईडीची कोठडीची मुदत उद्या (ता. 7) संपत आहे. उद्या ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर करतील. उद्याच्या सुनावणीत नवाब मलिक यांची ईडी कोठडीची मुदत संपणार…?? की वाढणार…??, याची उत्सुकता लागून राहिली आहे.Nawab Malik ED: Nawab Malik’s ED cell will end tomorrow ?? … or will it increase further
नवाब मलिक यांची यापूर्वी 4 मार्च रोजी संपत होती परंतु तेव्हा न्यायालयाने कोर्टाने त्यांना 7 तारखेपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पीएमएलए कोर्टाने हा निर्णय दिला होता. नवाब मलिक हे चौकशी आणि तपासाला सहकार्य करत नाहीत. उलट ते ईडीच्या अधिकाऱ्यांनाच धमक्या देत आहेत, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. याबाबत ईडीने काही कागदपत्रे कोर्टाला सादर केली आणि नवाब मलिक यांच्या कोठडीची मुदत वाढ मागितली. कोर्टाने नवाब मलिक यांची कोठडी 7 मार्च पर्यंत वाढवली होती.
बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड
नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. नवाब मलिक यांच्या नावावर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी मध्ये तब्बल 200 कोटींचा भूखंड असल्याचे आढळून आला. त्याच वेळी काल उच्च न्यायालयाने देखील नवाब मलिक यांना दणका दिला होता. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेले आरोप फेटाळण्याचा अर्ज नवाब मलिक यांनी केला होता.
त्या अर्जावर आज सुनावणी घेऊन ते आरोप न्यायालयाने फेटाळले नाहीतच, उलट सुनावणी पुढच्या सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याऐवजी दणकाच मिळाला होता.
नवाब मलिक पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी व विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर २ मार्च रोजी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली होती.
हायकोर्टात सोमवारी सुनावणी
नवाब मलिक यांना आता 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करत, मलिक यांनी आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र मलिकांची तातडीने सुटका होणार नाही.
नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता नवाब मलिकांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App