• Download App
    Nashik Corporate Jihad: Main Accused Nida Khan Arrested in Sambhajinagar कॉर्पोरेट जिहाद, निदा खानला संभाजीनगरातून अटक; 27 दिवसांपासून फरार निदा नारेगावच्या कैसर कॉलनीत लपली होती

    Nashik Corporate : कॉर्पोरेट जिहाद, निदा खानला संभाजीनगरातून अटक; 27 दिवसांपासून फरार निदा नारेगावच्या कैसर कॉलनीत लपली होती

    Nashik Corporate

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर :Nashik Corporate   नाशिकमधील आयटी कंपनी ‘टीसीएस’मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांना धर्मांतरासाठी सक्ती केल्याप्रकरणी 27 दिवसांपासून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) छत्रपती संभाजीनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली.Nashik Corporate

    देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 2 मे रोजी अटकपूर्व जामिन फेटाळण्यात आल्यापासून पोलिस तिच्या मागावर होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती. ती वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होती.Nashik Corporate



    मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने संभाजीनगर गाठले आणि अत्यंत गुप्तपणे मोहीम फत्ते करत तिला ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पथक तिला घेऊन नाशिककडे रवाना झाले असून उद्या तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. निदा खानच्या अटकेमुळे धर्मांतर प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

    ‘मिशन कन्व्हर्जन’ची जबाबदारी निदा खानकडे असल्याच्या संशयातून तपास

    नाशिक | निदा खानकडेच धर्मांतर घडवून आणण्याची जबाबदारी होती, असा संशय आहे. मुंबई नाका व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये निदा ‘वॉन्टेड’ आरोपी आहे. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. धार्मिक भावना दुखावणे, गुंगीचे औषधे देऊन अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे अशा गंभीर आरोपांची आहे. निदा खानच्या आधी या प्रकरणात एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    नारेगावमध्ये लपली होती

    दाटवस्ती असलेल्या नारेगावात ती नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ती किती दिवसांपासून या भागात रहात होती, तिच्या सोबत अजून कोण होते? याची माहिती घेणे रात्री उशीरापर्यंत सुरू होते. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील या बाबत माहिती घेतली.

    Nashik Corporate Jihad: Main Accused Nida Khan Arrested in Sambhajinagar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!

    जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!

    ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना; वैदिक मंत्रोच्चारात समतेचा गजर!!