वृत्तसंस्था
नागपूर: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसीबी) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या बाबतचा खटला चालविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता आसिफ कुरेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. Nagpur Bank scam: Cong’s office bearer chosen to plead case against Sunil Kedar
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कायदेशीर (एमपीसीसी), मानवी हक्क आणि माहिती अधिकार विभाग यांचे आसिफ कुरेशी अध्यक्ष आहेत. मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात विशेष सरकारी वकील म्हणून ते खटला चालविणार आहे. दुसरीकडे आता खटला पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना माजी विशेष सरकारी वकील (एसपीपी) ज्योती वाजानी यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांनी वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यानंतर गुंतवणूकदारामध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने कुरेशी यांच्या नियुक्ती करण्याचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, मला सरकारने नियुक्त केले आहे. मला सांगितले तर मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, असे कुरेशी यांनी सांगितले.
ज्योती वजानी या नामांकित सरकारी वकील म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी युग चांडक या बालहत्याकांडातील आरोपींना मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंत पोचविले आहे. बँक घोटाळ्याच्या खटल्यात बड्या राजकीय धेंडांचा समावेश आल्याचे उघड होताच उच्च न्यायालयाने ज्योती वाजानी यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.
याचिकाकर्ते ओमप्रकाश कामडी यांचे वकील श्रीरंग भांडारकर हे सरकारवर जोरदार टीका करताना म्हणाले, गेल्या 17 वर्षांपासून खटला लांबला आहे. आता तो लवकर निकाली लागणे अपेक्षित आहे. संघर्षाचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेसच्या मंडळींनी मंत्र्याविरोधात याचिका दाखल केली आहे. हे सर्व मुद्दे मी न्यायालयात मांडणार आहे. नवीन वकील नियुक्त करण्यापूर्वी ज्योती वाजानी यांची परवानगी सरकारने घ्यायला हवी होती. त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी एसआर तोतला यांच्या समोर सहा महिन्यात खटला चालणार आहे.
भ्रष्टाचार नेमका काय आहे :
राजकीय घडामोडी :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App