मुंबई हल्ल्याचे आरोपी पाकिस्तानात मोकाट; जावेद अख्तरांनी लाहोरात जाऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखविला आरसा


वृत्तसंस्था

लाहोर : एरवी भारतात लिबरल भूमिका घेऊन मोदी सरकारला धारेवर धरणारे बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी पाकिस्तान वर बौद्धिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे, तो देखील पाकिस्तान मध्ये जाऊन!!Mumbai Attack Accused Free in Pakistan; Javed Akhtar went to Lahore and showed a mirror to Pakistani rulers

पाकिस्तान मध्ये लाहोर शहरात फैज अहमद फैज लिटरेचर फेस्टिवल साठी जावेद अख्तर आले आहेत. येथे एका मुलाखती दरम्यान त्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना परखड शब्दांत सुनावले आहे. आम्ही मुंबईकर आहोत.



त्यामुळे मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे आम्हाला दुःख आहे आणि मुंबईवर हल्ला करणारे हल्लेखोर तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत. भारतीयांनी जर ही वेदना व्यक्त केली तर तुम्हाला वाईट वाटायला नको, अशा शब्दांमध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे.

जावेद अख्तर आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात कोर्टात संघर्ष सुरू आहे. तरी देखील कंगनाने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या राज्यकर्त्यांना परखड बोल सुनावल्याने त्यांचे कौतुक केले आहे. “घरमे घुसके मारा”, अशा शब्दांत कंगनाने जावेद अख्तर यांच्या कृतीची स्तुती केली आहे.

Mumbai Attack Accused Free in Pakistan; Javed Akhtar went to Lahore and showed a mirror to Pakistani rulers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात