नाशिक मध्ये मोगलाई : हिंदू नववर्ष स्वागताचे कार्यक्रम पोलिसी परवानगीच्या चक्रव्यूहातच अडकले!!; पोलीस आयुक्तांचे आरोप समितीने फेटाळले!!

प्रतिनिधी

नाशिक : हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागत कार्यक्रम आयोजनाचा वाद अजूनही नाशिकमध्ये पेटलेला असून नाशिक मध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि नववर्ष स्वागत समिती यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.Moghlai in Nashik: Hindu New Year welcome programs stuck in the maze of police permission !!; Committee rejects allegations of Commissioner of Police

मात्र, या सर्व प्रकारात हिंदू नववर्षाचे स्वागत सार्वजनिकरित्या कसे होणार?, हा प्रश्न तयार झाला आहे. त्याचबरोबर नाशिकचे ढोल वादन, महारांगोळी असे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार यंदा नाशिककरांना पाहायला मिळणार की नाशिककर या पारंपरिक स्वागत प्रकारांना यंदा मुकणार?, याची देखील चर्चा जोरदार चर्चा शहरभर सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे स्वागत कार्यक्रम नाशिककरांच्या मनासारखे झाले नाहीत यंदा हिंदू नववर्षाचे स्वागत कार्यक्रम पोलिसी परवानगीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यामुळे ढोल वादन, महारांगोळी याद्वारे हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची नाशिककरांची वर्षानुवर्षांची परंपरा सरकारी परवानगी चक्रात अडकून तिला खीळ बसणार का?, असा सवाल लाखो नाशिककरांपुढे आहे.



पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नववर्ष स्वागत समितीवर विविध आरोप केले. या आरोपांना नववर्ष स्वागत समितीने प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे .

नववर्ष स्वागत समितीची भूमिका अशी :

माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सदस्यांनी माझ्याकडे संपर्कच केला नाही, असा चुकीचा आरोप केला आहे. जर आम्ही संपर्कच केला नाही असं त्याचं म्हणणं असेल तर दिनांक ५ मार्च पासून आम्ही आवश्यक कागदपत्रांची फाईल जमा केली होती. त्यानंतर आयुक्तांनी वेळ दिल्यानंतरच २५ तारखेला दुपारी १२ वाजता आम्ही पोलीस आयुक्तालयात पोहोचलो, आयुक्तालयातील माननीय भुसारे साहेब आणि चौधरी साहेब यांच्याकडे आम्ही दोन ते अडीच तास बसलो. त्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार पुन्हा ५ वाजता आयुक्तालयात आलो.

पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास बाहेरच्या सोफ्यावर आम्ही किती तास बसून होतो याची तुम्हाला खात्री पटेल. ३ तास तिथे बसून राहिल्यानंतर साडेआठ वाजता संबंधित पोलीस महिला अधिकारी यांच्याकडे आयुक्त साहेबांच्या वेळेबाबत चौकशी केली असता त्यांनी आज तुम्हाला वेळ दिलेली नाही, असे सांगून उद्या या असे सांगण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही पोलीस आयुक्तालयात गेलो, सोबत माननीय खासदार हेमंत गोडसे यांचे स्वीय सहाय्यक माननीय मंडलिक हे देखील होते. त्यांनी देखील परवानगीसाठी आमच्यासोबत प्रयत्न केले, तेव्हा ते देखील दोन तास आमच्यासोबत बसून होते. तरी देखील आपल्यामार्फत परवानगी दिली गेली नाही, त्यादिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली.

त्यानंतर आम्ही माननीय पालकमंत्री भुजबळ साहेब यांना देखील फोन केला. त्यांनी आम्हाला सूचना दिली कक तुम्ही कार्यक्रम रद्द करू नका, तुम्हाला परवानगीची व्यवस्था केलेली आहे. मग आम्हाला आयुक्त कार्यालयातून फोन येतो की २८ तारखेला आयुक्त साहेबांनी भेटायला बोलावले आहे. जर हे सर्व कार्यक्रम २९ तारखेपासून सुरु होत आहेत तर २८ तारखेला भेट घेण्याला अर्थच काय ?

हे म्हणजेच एक प्रकारे परवानगी द्यायला चाल-ढकल करण्यासारखे आहे. आम्ही आजवर फक्त विनंतीच्या सुरातच परवानगीची मागणी केलेली आहे. उद्या या, परवा या, अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी टाळटाळ केली गेली याची माननीय आयुक्त साहेबांनी चौकशी करावी.

 

Moghlai in Nashik: Hindu New Year welcome programs stuck in the maze of police permission !!; Committee rejects allegations of Commissioner of Police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात