विशेष प्रतिनिधी
सांगली: देशाला म्लेंच्छ,अँग्लो आणि गांधीबाधा झाली आहे. देश उभारण्याची ताकत मिळायची असेल, तर तर हिंदुस्थानाच्या १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा केला पाहिजे’,असे विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक सभाजी भिडे यांनी केले आहे.Mlenchch, Anglo and Gandhi obstructed the country, Allegation of Sambhaji Bhide Guruji
मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना भिडे गुरुजी म्हणाले की, व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. खाण्या पिण्यातून विषबाधा होते. पण या समस्यांवर उपाय करता येतो. मात्र आपल्या देशाला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी अंग्लो बाधा आणि आणि तिसरी गांधी बाधा.
या तिन्ही बाधांवरील जर तोडगा कोणता असेल तर तो म्हणजे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांची त्याची उपासना आपण केली पाहिजे. उपासना याचा अर्थ त्यांना प्रिय असलेले कार्य पूर्ण करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न केला पाहिजे. आपला देश हा जगाचा दाता आहे. या देशाची उभारणी करण्याचा एकच उपाय आहे.
तो म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर अशा संपूर्ण देशातील जनतेचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज- संभाजी महाराज असा केला पाहिजे. मायभूमीच्या कपाळावरील हिंदुत्वाच्या स्वातंत्र्याचे कुंकू टिकवणारा आणि जगाचा संसार चालवणारा देश घडवायचा असेल तर हे फक्त छत्रपची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचारच करू शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App