मंदाकिनी खडसे ईडी अधिकाऱ्यांची भेट न घेताच आल्या माघारी

सकाळी १० वाजता मंदाकिनी खडसे त्यांच्या वकिलासोबत मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या. मात्र, त्या ईडी अधिकाऱ्यांची भेट न घेताच परत माघारी गेल्या.Mandakini Khadse returned without meeting the ED officials


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवलं होत.त्यामुळे सकाळी १० वाजता मंदाकिनी खडसे त्यांच्या वकिलासोबत मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या. मात्र, त्या ईडी अधिकाऱ्यांची भेट न घेताच परत माघारी गेल्या.



खडसे यांचे वकील मोहन टेकावडे म्हणाले की , “कोर्टाच्या आदेशाने १० ते ५ या वेळेत कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार आम्ही आलो होतो. सकाळी १० वाजता ईडी कार्यालय बंद होतं.साडेदहा वाजता ईडी कार्यालय उघडतं म्हणून आम्ही वाट पाहिली. बहुतेक तपास यंत्रणांना सुट्टी नसते, ती कार्यालयं नेहमी सुरू असतात. आज सुट्टीबाबत काही सूचना नव्हती. कोर्टाच्या आदेशाने मंगळवारी आणि शुक्रवारी जाण्यास सांगितले होते, त्यानुसारच आम्ही आलो होतो. आज भेट झाली नाही, त्यामुळे शुक्रवारी परत येणार आहोत.”

Mandakini Khadse returned without meeting the ED officials

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात