विशेष प्रतिनिधी
शिर्डी : CM Devendra Fadnavis राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सरकार गंभीर असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल, तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.CM Devendra Fadnavis
शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षी किती इंधन लागते याचा अंदाज प्रशासनाला असतो, मात्र अचानक इतकी वाढ होत असेल तर त्यामागे काहीतरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना इंधन मिळावे आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही जिल्ह्यांत वाहनांचे आरसी बुक तपासून डिझेल देण्याची पद्धत सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.CM Devendra Fadnavis
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसेच पुरवठा साखळीतील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. अचानक वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डीमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू
दरम्यान, शिर्डीमध्ये आज संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून शिर्डीची ओळख आता धार्मिक केंद्रासोबत संरक्षण उत्पादन क्षेत्रातही निर्माण होणार आहे.
30% Spike in Petrol-Diesel Demand Suspicious: CM Devendra Fadnavis Orders Probe
महत्वाच्या बातम्या
- रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी; अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!; उदयनराजेंची टीका खरी!!
- Trump : ट्रम्प पुन्हा इराणवर हल्ल्याच्या तयारीत? तेहरानवर B-2 बॉम्बरचा धोका, मध्यपूर्वेत तणाव पुन्हा शिगेला
- वारकऱ्यांची बदनामी करणाऱ्या विकास लवांडेंना न्यायालयाचा दणका; येरवडा कारागृहात रवानगी!!
- पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश!!