दरम्यान बारावीची परीक्षा 4 मार्च दिवशी इंग्रजी विषयाने होणार आहे.तर ३० मार्च रोजी दिव्यांग पात्र विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र/ भूगोल/ समाजशास्त्र या विषयाने होणार आहे.Maharashtra board SSC, HSC Exam Timetable 2022: Finally announced the schedule of 10th and 12th exams; The first paper will be on this day
विशेष प्रतिनिधी
मुंबई : यंदा दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचं मोठं आव्हान यंदा बोर्डासमोर असणार आहे. त्या पार्श्भूमीवर बोर्डाकडून खबरदारी देखील घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी,बारावी परीक्षा २०२२ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून आज (२१ डिसेंबर) बोर्डाने विषयांनुसार सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. वेळापत्रकात दहावीच्या परीक्षेची सुरूवात १५ मार्च दिवशी होणार असून पहिला पेपर भाषेच्या विषयाने होणार आहे तर शेवट ४ एप्रिल दिवशी भूगोल या विषयाने होणार आहे.
दरम्यान बारावीची परीक्षा ४ मार्च दिवशी इंग्रजी विषयाने होणार आहे.तर ३० मार्च रोजी दिव्यांग पात्र विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र/ भूगोल/ समाजशास्त्र या विषयाने होणार आहे. तसेच लेखी परीक्षेसोबतच यंदा १ फ्रेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे.२५ फेब्रुवारी ते १४ मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे.तसेच तुम्ही तुमच्या शाखेनुसार आणि इयत्तेनुसार परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsscboard.in वर भेट द्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App