विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Recruitment राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेली ५०१२ सहायक प्राध्यापकांची आणि विद्यापीठांमधील ६०० अशा एकूण ५६१२ पदांची भरती प्रक्रिया येत्या जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२१ फेब्रुवारी) येथे दिली.Maharashtra Recruitment
या संदर्भात माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थिसंख्या आणि प्राध्यापकांची आवश्यकता याचा सखोल अभ्यास पूर्ण झाला आहे. येत्या चार दिवसांत कोणत्या महाविद्यालयाला किती पदे मिळणार, हे स्पष्ट होईल. त्यानंतर तत्काळ रोस्टरची प्रक्रिया राबवण्यात येईल. या सर्व तांत्रिक बाबी मार्चपूर्वीच पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. जे महाविद्यालये जागा भरण्यास टाळाटाळ करतील, त्या जागा इतर गरजू महाविद्यालयांना वळवण्याचा विचारही सरकार करत आहे.Maharashtra Recruitment
रोस्टर तपासणीनंतर भरतीला राज्यात येणार वेग
राज्यातील महाविद्यालयांच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित केलेल्या कार्यभाराचा आधार घेऊन ही पदभरती केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी राज्यातील सर्व महाविद्यालयांची विद्यार्थीसंख्या संबंधित विद्यापीठांकडून यापूर्वीच प्रमाणित करून घेण्यात आली आहे. जून-जुलैपर्यंत नवीन प्राध्यापक वर्गात शिकवायला गेले पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य असणार आहे.
विद्यापीठात दर्जेदार प्राध्यापकच
विद्यापीठ भरतीमधील ६०-२०-२० या निकषाबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, “विद्यापीठांची गुणवत्ता वाढवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. ही केवळ रोजगार योजना नसून, येथे दर्जेदार प्राध्यापकांचीच गरज आहे. राज्यपाल महोदयांनी यासाठी अत्यंत कठोर निकष लावले आहेत.” तसेच, कोविड काळात विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक आता पुन्हा एकदा रुळावर आले असून, आगामी प्रवेश प्रक्रियाही वेळेवर पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App