सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून पंकजा मुंडे यांनी जनतेने मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केलेले आहे.Mahadev Jankar said – ‘If the meeting is not called, it will sit in the audience; With the permanent support of Pankaja Munde as a brother
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची मागील कित्येक दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्याचे मोठ्या जोशात नियोजन करण्यात आले आहे.
सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून पंकजा मुंडे यांनी जनतेने मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केलेले आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी दसरा मेळाव्याला कोणालाही विषेश अतिथी म्हणून बोलावलेले नाही.
यावेळी महादेव जानकर म्हणाले की ,“पंकजा मुंडे या भगवान गडावरील मेळाव्याच्या क्रियेटर आहेत. पंकजा मुंडे यांच्या मागे कुणी असो अथवा नसो, मी भाऊ म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे. पंकजा मुंडे यांनी बोलावलं नाही तर मी मेळाव्याला येणार. ऑडिशनममध्ये बसेल पण दसरा मेळाव्याला मी जाणार आहे.”
तसेच पुढे जानकर म्हणाले की, “बहीण एखाद्या ठिकाणी अस्वस्थ असेल तर ती भावाला बोलून दाखवते. पण पंकजा ताईंनी मला असं काही बोलून दाखवलं नाही. त्यामुळे नाराज आहेत असं मला वाटत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App