वृत्तसंस्था
प्रयागराज : भोंग्यांबाबत अलाहाबाद न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही, असे अलाहाबाद न्यायालयाने म्हटले आहे. मशिदीबाबतच्या भोंग्यांवर न्यायालयाचा हा मोठा निर्णय आला आहे. It is not a fundamental right for the ignorant to blow the trumpet
याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी तिथल्या मशिदींवर भोंग्यांना परवानगी नाकारली होती, त्यानंतर तिथले मुतवल्ली इरा खान अलाहाबाद हायकोर्टात दाद मागायला गेले होते. त्यांनी जिल्हाधिका-यांसह आणखी तीन लोकांना यात पक्षकार बनवले होते. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, अजानसाठी मशिदींवर भोंगे लावणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
अलाहाबाद हायकोर्टाने मुठवली हिरा खान यांचा अर्ज पूर्णपणे फेटाळला आहे. मशिदींवर अजानसाठी अशाप्रकारे भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही हे या याचिकेच्या सुनावणीत हायकोर्टाने स्पष्ट केले आणि त्यामुळे महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशभरात हा वाद गाजत असताना, अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App